शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न आणि विकासाचा अनुशेष लवकरच भरून काढू- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
नागरिकांच्या वेळोवेळी प्राप्त झालेल्या मागण्यानुसार बीड शहरातील विकासाची कामे सुरू असून प्रभाग क्रमांक सात मधील सिमेंट रस्ते आणि नाल्यांची 63 लाख रुपयांची कामे तातडीने होत आहेत बीड शहराच्या हद्द वाढीचा प्रश्न आणि शहरातील उर्वरित विकासाचा अनुशेष पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे
शहरातील जव्हेरी गल्ली येथे जव्हेरी गल्ली, पिंगळे गल्ली, गवळी गल्ली, कबाड गल्लीतील परिसर आदी ठिकाणच्या सिमेंट रस्ते व नाली बांधकामाचे माजी मंत्री आदरणीय जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी जव्हेरी गल्ली परिसराची पाहणी करत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागत आहे याचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी गजानन बँकेचे उपाध्यक्ष जगदीशभाऊ काळे, डॉ.योगेश क्षीरसागर,परशुराम गुरखुदे, इकबाल शेख, नगरसेवक राजेंद्र काळे, प्रा.किशोर काळे, गोपाळ गुरखुदे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब आंबेकर ,राजूशेठ जव्हेरी, अंबादास नवले, रवींद्र जव्हेरी, रुपेश यादव, आशिष काळे, युनूस शेख, आमेर सिद्दीकी, राहुल गुरखुदे, साजेद जागीरदार, विक्रम चव्हाण, रामेश्वर मगर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करून शहरातील मुख्य रस्त्यांची कामे करून घेत आहोत नगरोत्थान योजनेअंतर्गत 86 कोटीची 16 रस्ते पूर्ण झाले असून आता 68 कोटी मधील 12 रस्त्याची कामे सुरू आहेत तर मुख्य तीन रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव दाखल असून कंकालेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 20 कोटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंचे पुनर्जीवन करणे महत्त्वाचे असून तशा प्रकारचा पाठपुरावा देखील सुरू आहे शिवशारदा बिल्डिंग ते अमरधाम, थिगळे नाना कॉम्प्लेक्स ते स्टेडियम आणि जालना रोड ते कॅनॉल रोड (शांताई हॉटेल) यासाठी 21 कोटी रुपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे
यावेळी युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी सांगितले की प्रभागातील नागरिकांची मागणी सातत्याने केवळ रस्त्यांची आणि नाल्यांची कामे करण्यासाठी होत असते त्यामुळे यासाठी स्वतंत्र प्रस्ताव दाखल करून आपण ते मंजूर करून आणले आहेत सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे दर्जेदार करून घेण्यासाठी आपला प्रयत्न आहे शहरातील लहान लहान गल्ल्यामधील रस्त्यांची चांगली आणि दीर्घकाळ टिकतील अशी कामे आपण करून घेत आहोत मोठ्या रस्त्यांची कामे पूर्ण होत असताना लहान रस्त्यांची कामे देखील आपण करत आहोत प्रभाग क्रमांक सहा सात आणि आठ या तिन्ही प्रभागातील कामे लवकरच पूर्ण केली जातील सध्या सुरू असलेल्या सर्वच कामांमुळे जवळपास 80 टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झालेली आहे उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे यावेळी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment