सनी लिओनी,सपना चौधरी चालते पण गौतमी पाटील चालत नाही वारे जनता - डॉ. जितीन वंजारे


           लिहिण्यासारखा विषय अजिबातच नाही परंतु महाराष्ट्राच्या कला युगामध्ये जी जातीयता पसरत चाललेली आहे या कारणामुळे लिहिण्यास प्रवृत्त होत आहे,यामध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे सामान्य घराण्यातील अतिशय गरीबी परिस्थिती मधून स्वतःच्या नृत्यकलामुळे-डान्स मुळे विशेष प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटील या नृत्यांगणीला जो विरोध होताना दिसत आहे हे पाहता बॉलीवूड सारख्या पवित्र अशा ठिकाणी सनी लियोनी सारखी अपवित्र पॉर्नस्टार सहजासहजी उच्चपदस्थ होते बॉलीवूडमध्ये ती तिचे प्रस्त निर्माण करते तिथे कसलाही प्रकारच्या विरोध होत नाही,राधिका आपटे,सई ताम्हणकर अशा अभिनेत्रीने अंग प्रदर्शन करून एखादा सीन चित्रपटांमध्ये दिल्यास ती अजिबात ट्रोल होत नाही तो फक्त एक बोल्ड सिन असतो त्यावर कोणाच्याच लेखण्या उंचावत नाहीत परंतु गौतमी पाटील सारख्या सामान्य कुटुंबातून टॉप पर्यंत पोहोचवणाऱ्या मुलीला समाज नागडी-उघडी आणि खालच्या दर्जाची कलाकार म्हणून जेव्हा संबोधन करतो तेव्हा माझ्यातला लेखक , कलाकार जागा झाल्याशिवाय राहत नाही. कारण "तुम करे तो रासलीला और हम करे तो कॅरेक्टर ढीला" अशा पद्धतीचा जो काही संदेश स्वतःला मोठमोठे वक्ते,लेखक, कलाकार अभिनेते म्हणणाऱ्या लोकांना गौतमी पाटील हिला खाली लेखण्याचा काहीही अधिकार नाही.मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जी उच्चवर्णी यांची वर्णी लागताना दिसत आहे हे पाहता सामान्य कुटुंबातील एखाद्या अभिनेत्रीने किंवा कलाकार नृत्यंकनाने उत्तुंग अशा पद्धतीची गगन झेप जर घेतली तर तिला खेचण्यासाठी लाखो हात सरसावतात अशा वेळेला तुमच्या आमच्यातला कलाकार, लेखक,दिग्दर्शक जागा व्हायला पाहिजे आणि सामान्यातल्या सामान्य परंतु उच्च कलाकारी ने परिपूर्ण असणाऱ्या गौतमी पाटील सारख्या नित्यांगणाला जाहीरपणे समर्थन दिले पाहिजे तर आणि तरच मराठी पाऊल पुढे पडेल नसता खेकडा वृत्ती ने आपण सगळेच मागे पडू कारण आपला मराठी माणूस पुढे जाताना आपणच खपवून घेत नाहीत हेच आपल्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यांच्यासारखे आपण होऊच शकत नाहीत अशा पद्धतीची आपल्या मनामध्ये आपण निर्माण करून घेतलेला जो न्यूनगंड आहे तो अगदी चुकीचा असून सामान्याच्या सामान्यतून सुद्धा गगन भरारी घेणारे टॉपचे कलाकार निर्माण होऊ शकतात अशा पद्धतीचा संदेश देणारी गौतमी पाटील ही कलाकारी क्षेत्रातील आपली आदर्श असायलाच हवी. तेंव्हाच आपल्यातील कलाकार जिद्द चिकाटी आणि मेहनती च्या जोरावर टॉप वर जातील.
           गलिच्छ पद्धतीच्या पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आपल्या शरीराची उधळण करणारी एक अभिनेत्री बॉलीवूडमध्ये येऊन आपली पत निर्माण करते त्याबद्दल आपण काहीही बोलत नाहीत, विशिष्ट चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या उच्च जातीच्या अभिनेत्रींनी घाणेरडे सिन करतात तरी आपण त्यांना सहजच बोल्ड सिन आहे म्हणून विषय संपवून टाकतो परंतु एक सामान्य कुटुंबातील गौतमी पाटील सारख्या अभिनेत्री कलाकार नृत्यांगना या महाराष्ट्राला वेड लावते प्रसिध्द होते तेच आपल्याला खपत नाही हे दु्दैव त्याविषयी आपल्या मनामध्ये इतका तिरस्कार निर्माण होतो की आपण तिला खेचण्यासाठी पुढे सरसावतो ही महाराष्ट्र मातीला मागे घेणारी गोष्ट आहे एक कलाकार म्हणून तिच्याकडे पाहिले पाहिजे या कलियुगामध्ये जे पाहिजे ते तुम्ही दिल्यास तुम्ही टॉपवर गेल्याशिवाय राहणार नाही. आज-काल कीर्तन सांगणाऱ्या महाराजांमध्ये जे काही बदल झालेले आहेत स्वतःच्या नावापुढे हास्यप्रेमी,शब्द प्रेमी, विनोदी कीर्तनकार अशा पद्धतीचे जे परिवर्तन झालेला आहे तशाच पद्धतीचा परिवर्तन प्रबोधनांमध्ये कलाकारीमध्ये ,अभिनयामध्ये होणं हे वावगं नाही हे झालंच पाहिजे कारण "बदल हा निसर्गाचा नियम आहे" त्याप्रमाणे युवापिढी ला जे पाहिजे ते गौतम पाटील देतेआहे ते पण पूर्ण अंग भरून कपडे घालून त्यामुळे तिचा विरोध होणार हे साप चुकीचा आहे.तिचा विरोध करण्यापेक्षा एक कलाकारी,अभिनय किंवा नृत्य मनोरंजन म्हणून पाहिलं पाहिजे असे स्पष्ट मत कलाप्रेमी मा सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.
         आपल्या मनातील टॉपचे कलाकार म्हणजे कपूर, जोशी, खानविलकर,फडणवीस,चौधरी, लियोनी, दत्त,खान,अरोरा,अग्रवाल,अशाच पद्धतीची माईंडसेट तयार केलेले आहेत त्यामुळे याच्या व्यतिरिक्त कोणी प्रसिद्धीस पावता कामा नये अशा पद्धतीची विव्हरचना बॉलीवूड,हॉलीवुड, ट्रोलीवुड आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा होताना दिसत आहे यामुळे सामान्यातल्या सामान्य कलाकारांना वाव मिळत नाही. ज्याच्यामध्ये आपलीच अधोगती होणार आहे आपण मोठया मनाने कलाकारी पाहिलं पाहिजे ना की आडनाव ,धर्म, जात कारण कलाकाराला ह्या भौतिक सीमा नसाव्यात अश्या विचाराचा मी आहे .नहितर त्यांची नाचली तर नृतिका आणि आपली नाचली तर नाची असा खेळ आता बंद करा. चित्रपट सृष्टी जरी तुम्ही काबीज केली तरी जनसामण्याच्या मनातील टॉप ही गौतमीच असणार आणि स्टेज शो मध्ये तिला अशीच एखाद्या मोठ्या अभिनेत्री किंवा राजकारन्यासारखी प्रसिद्धी मिळेल कारण स्वतःच्या दमावरती जनतेमधून एखाद्या मंत्र्यांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळत असताना तो अशा पद्धतीने बदनाम करणं म्हणजे तुमच्या मनातील पाप सरळ सरळ या महाराष्ट्राला आणि भारताला दिसून येत आहे त्यामुळे एक सामान्य कलाकार किंवा कलाप्रेमी म्हणून आपण सर्वांनी गौतमी पाटील या मराठी आणि आपल्याच मातीतील उच्च कलाकारीने परिपूर्ण असणाऱ्या नर्त्यांगणाला जाहीरपणे सपोर्ट द्यायला पाहिजे.आपल्यातील कलाकार मोठे केले पाहिजेत असे स्पष्ट मत आणि गौतमी पाटील ला स्पष्ट समर्थन डॉ जितीन वंजारे यांनी दिले आहे.


सनी लिओनी,सपना चौधरी चालते पण गौतमी पाटील चालत नाही वारे जनता - डॉ. जितीन वंजारे

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी