भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा (पश्चिम)ची महत्वपूर्ण बैठक




बीड प्रतिनिधी : दि. 28 भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पश्चिम अंतर्गत असलेले तालुका शाखा बीड, गेवराई, वडवणी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार तसेच शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, माजी श्रामनेर, बौद्धाचार्य, समता सैनिक, केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका आणि दहा दिवसाचे प्रशिक्षण घेतलेले उपासक-उपासिका यांना कळविण्यात येते की नागसेन बुद्ध विहार पालवन चौक बीड येथे दिनांक 11 मार्च 2023 शनिवार रोजी दुपारी ठीक 2 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने व तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्षांच्या सुचने वरुन अतिमहत्त्वाची सर्वसाधारण बैठक आयोजित करण्यात आली असून सदर बैठकस एस.के. भंडारे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी,बी.एच. गायकवाड राष्ट्रीय सचिव, भिकाजी कांबळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, के.आर.पडवळ विभागवीय सचिव महाराष्ट्र राज्य,या प्रमुख मान्यवराच्या अधिपत्याखाली होनार आहे. तरी वरील दर्शविलेल्या सर्व,बीड जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, यांनी
 बैठकीला दिलेल्या वेळेवर उपस्थित राहावे असे आव्हान महालिंग निकाळजे बीड जिल्हा पश्चिमचे निमंत्रक यांनी केले आहे. तर या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या बैठकीत सहभाग नोंदवावा.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी