तुलसी कॉलेज मध्ये मराठी दिन, विज्ञान दिन साजरा



बीड(प्रतिनिधी):- तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.२७ फेब्रुवारी रोजी मराठी दिन तर २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी.जी.निकाळजे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मराठी दिन, विज्ञान दिनाचे महत्त्व सांगण्यात आले.

यावेळी बोलताना प्राचार्य डी.जी. निकाळजे म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो असे सांगितले. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला आहे. तर भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो असे प्राचार्य निकाळजे यांनी सांगितले. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो.
रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात.या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते असे सांगून प्राचार्य निकाळजे यांनी विद्यार्थ्यांना मराठी दिन आणि विज्ञान दिनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी प्रा.डॉ.योगिता लांडगे प्रा.डॉ.विकास वाघमारे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी