मराठी भाषा गौरव दिन उत्साहत साजरा,जि प प्रशाला सोयगांव या शाळेत कवी व थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जयंती ,



सोयगाव (प्रतिनिधी यासीनब बेग) मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संजय शहापुरकर सामाजिक कार्यकर्ते होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक डाॅ.प्रशांत देशमुख आप्पासाहेब रघूनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालय शेंदुर्णी व प्राध्यापक विक्रम पाटील ग्राम विकास महाविद्यालय पिंपळगांव(हरेश्वर),केंद्रप्रमूख फिरोज तडवी सर ,विष्णु मापारी उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती प्रशाला सोयगांव उपस्थित होते.या प्रसंगी प्राध्यापक डाॅ.प्रशांत देशमूख यांनी बोलतांना विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाचे धडे गिरवायला हवे व निरीक्षण शक्ति चांगल्याप्रकारे विकसित करावी असे मत मांडले.विद्यार्थ्यांनी स्वत:ज्ञान मिळवण्यासाठी धडपड केली पाहीजे असे मत मांडले.प्राध्यापक विक्रम पाटील सरांनी हसतखेळत मूलांना पक्षी निरीक्षण व मराठी भाषा कशाप्रकारे समृद्ध करता येईल याबाबत चर्चा केली .केंद्रप्रमुख फिरोज तडवी व विष्णु मापारी यांनी ही मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पंकज रगडे सर यांनी केले.कु .सोनल चव्हान हीने मराठी भाषेची महती आपल्या प्रभावी शैलीत मांडली .प्रमूख वक्त्यांचा परिचय कु पुनम नप्ते व सोनल चव्हान ने करुन दिला.या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रमही घेण्यात आला.100च्या जवळपास गूणवंतांचा सत्कार करण्यात आला.संजय शहापुरकर यांनीकार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री डी.एस.परदेशी सरांनी केले.व आभार कु वर्षा परदेशी हिने व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी