निष्क्रिय राज्य महिला आयोग बरखास्तीसाठी आंदोलन; महिला आयोग आपल्या दारी उपक्रम थोतांड
___
बीड शहरातील महिलांसाठी शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत यासाठी वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई न करणा-या तसेच सामाजिक कार्यकर्त्या तथा विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किस्किंदाताई पांचाळ यांना २ महिन्यापेक्षा जास्त दिवस आझाद मैदानावर उपोषण करून सुद्धा भेट न घेणा-या अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य रूपालीताई चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी
आणि महिलांना न्याय देण्यास सक्षम नसलेल्या केवळ कागदोपत्रीच दिखावा करणा-या
निष्क्रिय राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य बरखास्त करण्यात यावा या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ फेब्रुवारी सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस च-हाटकर,शेख मुबीन, मिलिंदसरपते, शेख मुश्ताक,किस्किंदाताई पांचाळ , संस्थापक अध्यक्ष किस्किंदाताई पांचाळ,संध्या भोसले तालुकाध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती,पुनम वाघमारे ,शिवकन्या कागदे, जेबा शेख, ललिता अडाणे आदि सहभागी होते.
७ वेळा महिला आयोगाने जिल्हाप्रशासनाला पत्र लिहून सुद्धा सुधारणा नाही
____
बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली २ वर्षापासून वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य कार्यालय मार्फत जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधिक्षक बीड यांना दि.२२ जानेवारी २०२१ ,दि.०५ एप्रिल २०२१ ,दि.३० जुन २०२१ ,दि.०९ ऑगस्ट २०२१ ,दि.२६ ऑगस्ट २०२१ ,दि.२९ मार्च २०२२ दिलीच.०६ जुन २०२२ ऑअशा तारखेनुसार आपल्या कार्यालयामार्फत निवेदनातील मुद्यांबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत ईमेल पाठवलेला आहे परंतु एकंदरीतच कोणतीही सुधारणा व कारवाई झालेली नाही. त्यामुळेच अशा निष्क्रिय राज्य महिला आयोगाची आवश्यकता नसुन तो तात्काळ बरखास्त करण्यात यावा
पांचाळ
२ महिन्यापेक्षा जास्त दिवस आझाद मैदानावर उपोषण करून सुद्धा भेट न घेणा-या रूपालीताई चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात यावा
____
सामाजिक कार्यकर्त्या तथा विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष किस्किंदाताई पांचाळ यांनी महिला बचतगटातील महिलांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल तसेच दडपशाही करत पदाचा गैरवापर करणा-या सदस्य राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य संगीता चव्हाण यांच्या विरोधात चौकशी व कार्यवाहीस्तव दि.२५ एप्रिल २०२२ ते दि.२४ जुन २०२२ पर्यंत आणि दि.२२ ऑगस्ट २०२२ ते दि.२५ ऑगस्ट २०२२ पर्यंत असा २ महिन्यापेक्षा जास्त दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करून सुद्धा रूपालीताई चाकणकर यांनी त्यांची भेट घेतली नाही त्यामुळेच महिला आयोग आपल्या दारी उपक्रम थोतांड असून केवळ दिखाऊपणा असुन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य रूपालीताई चाकणकर कर्तव्यदक्ष नसल्याचे पुराव्यासह दिसून येत असून त्यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात यावा.
Comments
Post a Comment