गंध फुलांचा गेला सांगून ...!रंग फुलांचा आहे अजून ...!
सोयगाव प्रतिनिधी मुश्ताक शाक
सोयगाव तालुक्यातील अजिठा पर्वत रांगेतील परिसरात व शेती बांधावर पांगऱ्याची झाडे आणि पळसाची झाडे लाल रंगाच्या फुलाने बहरुन गेलेली दिसत आहेत.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगातून झाडा बद्दल असे सुंदर वर्णन केलेले आहे ते म्हणतात की वृक्ष हे दुसरे तीसरे कुणी नाही तर आपले सगे सोयरे आहेत .
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे अशा गोंडस अभंग मध्ये त्यांनी मानवाला वृक्षावरती प्रेम करायचे सांगितले आहे.
परंतु त्या अभंगाच्या शब्दाकडे लक्ष न देता अलीकडे फळ फळावर देणारी मोठमोठी झाडे तोडली जात आहे. जसे की चिंचेच झाड,आवळा,कविट,आंबा,बोरं,जांभळं,बाभुळ,टेंबुर,लिंबाचे,साग,चिकू,सिताफळ,रामफळझाड या विविध झाडापासून आपणास गोड गोड नैसर्गिक गोड व आबट फळे चाखावयास मिळतात तर अनेक झाडांपासून संसाराला उपयोगी पडणारी फर्निचर आणि घरातील विविध प्रकारच्या वस्तू बनवून मिळतात. सांगायचे ठरवले तर या पलीकडे देखील सफरचंद ,डाळिंब, चिकू, मोसंबी,संत्र,केळी, ही गोड चवदार फळे यश चाखावयास मिळतात.
हिवाळा, पावसाळा, उन्हाळा ,असे तीन ऋतू येतात काही ऋतूमध्ये वृक्षाची पानझड होते.
तर चैत्र महिन्यात मात्र वृक्षांना नव नवीन पालवी येते त्यामुळे सर्व झाडे नव्या नवरी प्रमाणे हिरवा शालू नेसल्यागत दिसून येतात पळसाची झाड आणि पांगराची झाड यांनी तर आपला रंग अजूनही जिवंत ठेवलेला दिसतो.
सध्या तरीअनेक प्रकारचे केमिकल टाकून अनेक कलर तयार करून संध्या बाजारात विविध प्रकारचे रंग तयार केले जातात.
त्याची विक्री केले जाते
व धुलीवंदनाला रंगाची नाचत गात त्यांची उधळण केले जाते.
परंतु काही केमिकल मिश्रीत रंगामुळे शरीराला अपायकारक सुद्धा ठरतात परंतु निसर्गाने होळी व धुलीवंदनाच्या उत्सवात गेल्या हजारो वर्षापासून जिवंत आहे .
ही परंपरा अजूनही खेड्यात ग्रामीण भागामध्ये जोपासली जाते आहे.
पळसाच्या झाडाची लाल फुले व पांगराच्या झाडाची लाल फुले आजही बच्चे कंपनी राणा वनातून शेतांच्या बांधावरून तोडून आणून ही फुले उन्हात वाळू घातली जातात व होळीच्या पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी धुलीवंदन येते तेंव्हा ती तोडलेली फुले त्या दिवशी साचलेल्या पाण्यामध्ये भिजवून गोळा करून त्याचा चुरा केला जातो.
या प्रक्रियेतून त्यातून निघालेला लाल रंग पिचकारी मध्ये भरून रंगपंचमी आजही ग्रामीण भागामध्ये अति उत्साहात साजरी केली जाते.
परंतु अलीकडे बेकायदा व अवैधरित्या होत असलेल्या वृक्षतोडीमुळे ही झाडे दुर्मिळ झाल्यामुळे कमी प्रमाणात दिसून येतात .
प्रत्येक वृक्षाच्या पाठीमागे कुठली ना कुठली भूमिका आहे परंतु आपण त्यांच्या सर्वस्वी विचार न करता ग्रामीण भागात पळसाच्या पाण्याचे फुलाचे आजही महत्व आहे. आजही ग्रामीण भागाततील बाल गोपाळ बच्चे कंपनी फुले वेचून उन्हात सुकवतात आणि रंगपंचमी सण उत्साह साजरा करतात .
ही झाडे अगोदर ज्या ठिकाणी पानाचे तांडे लावले जात असायचे त्या ठिकाणी मात्र पांगऱ्याची झाडे ही असंख्य प्रमाणामध्ये दिसून यायची परंतु सध्या तरी पाण्याअभावी अलीकडे बारी समाज बांधवांनी काही प्रमाणात ता़ंडे लावण्याचा व्यवसाय बंद केल्याने ही लाल, लाल, रंगाच्या फुलांची पांगऱ्याची झाडे आता कमी प्रमाणात दिसून येतात .
परंतु आजही पळसाची झाडे मात्र अजून मोठ्या प्रमाणात लालबुंद फुलाने बहरुन गेलेल्या असलेला अवस्थेत दिसून येतात.
अलीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा वृक्षतोड बंद करा कुऱ्हाड बंदी करा असा संदेश देत असतांनाही मात्र ग्रामीण भागात संबंधित विभागाच्या बेजबाबदार व हलगर्जीपणामुळे अमाप अशी वृक्षतोड चालू असताना दिसून येते.
तेव्हा याकडे संबंधित जबाबदार अधिकाऱ्याने लक्ष द्यावे अशी मागणी देखील वृक्ष प्रेमी करतांना दिसतात .
वटसावीत्री पौर्णिमेला माता भगिनी आज ही वटवृक्षाच्या झाडाला जन्मो जन्मी हाच पती मिळावा यासाठी वटसावित्री पौर्णिमेला पुजा करुन प्रदक्षिणा घालून उपवास करतात.
श्रावण महिन्यात तर बेलांच्या पानांचे महत्त्व तर सर्व माता भगिनींना ज्ञात आहे.
श्रावण महिन्यात दैनंदिन उपासना करतांना महादेवाच्या मंदिरात जाऊन बेल वाहुन भक्ती भावाने दर्शन घेऊन भावी भक्त मन प्रसन्न करतात तेव्हा अनेक झाडा मागे काही तरी महत्व आहे हे विसरून चालणार नाही.
Comments
Post a Comment