सोयगाव येथील सर्वरोग निदान उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद



सोयगावच्या इतिहासात पहिल्यांदा झाले सर्वाधिक मोठे आरोग्य शिबीर

 5 हजार रुग्णांनी घेतला लाभ 

आलेल्या रुग्णांना जेवणासह देण्यात आला मोफत औषोधोपचार     


  सोयगाव ( प्रतिनिधी यासीन बेग) दि.26, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सोयगाव सह जवळपासच्या गावांतील विविध आजारांचे जवळपास 5 हजार 360 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आला. विविध आजारांचे जवळपास 75 तज्ञ डॉक्टरांनीं या शिबिरात सहभाग घेतला होता. शिबिरात आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
 
      रविवार ( दि. 26 ) रोजी शहरातील नॅशनल मराठी हायस्कूल शाळेच्या प्रांगणात तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच ना.अब्दुल सत्तार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे पाहिल्यांदा मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  

     युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अभिष्टचिंतनमूर्ती अब्दुल आमेर अ. सत्तार यांच्यासह सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख देविदास लोखंडे, सोयगाव तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, नगराध्यक्षा श्रीमती आशाबी तडवी, जिल्हा महिला आघाडीच्या दुर्गाताई पवार, सिल्लोडचे नगरसेवक शेख सलीम हुसेन, विठ्ठल सपकाळ, रईस पठाण, संजय मुरकुटे,संतोष खैरनार,अकील देशमुख,मारुती वराडे, हाजी मो.हनिफ, रवी पवार, एकनाथ शिंदे,भगवान नाईक,महेश पाटील,अमोल कुदळ, राजुमिया देशमुख, मनोज जैस्वाल,गोपी जाधव,राहुल महाजन,रुपेश जैस्वाल, सोयगाव येथील शहरप्रमुख संतोष बोडखे, गटनेता अक्षय काळे, मा. सभापती धरमसिंग चव्हाण, लतीफ शहा, गजानन कुडके, संध्याताई मापारी, ध्रुपताबाई सोनवणे,भगवान जोहरे, राजू दुतोंडे, कदीर शहा, अशोक खेडकर, राजेंद्र घनघाव, दिलीप देसाई, रमेश गव्हांडे, अमोल मापारी, विक्रम चौधरी, नंदू हजारी, भगवान वारंगणे, किशोर मापारी, मंगेश सोहनी, मुकुंद तळेले, भिका अप्पा, योगेश नागपुरे, शिवाप्पा चोपडे, बाबू चव्हाण, सुरेश चव्हाण, सलीम पठाण, शमा तडवी, भरत राठोड आदींची उपस्थिती होती.
-----------------------------------------------
         कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य जनतेला एकाच छताखाली आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत मिळाव्यात या दृष्टीने सोयगाव येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर्स , मेडिकल असोसिएशन व मित्र मंडळाच्या अथक परिश्रम व नियोजनातून या शिबिरात हजारो रुग्णांणी लाभ घेतला. उत्स्फूर्तपणे या शिबिराला प्रतीसाद मिळाला, येत्या वर्षी या शिबिराची व्याप्ती वाढवून जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळवून देऊ असे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर म्हणाले. 

       राजकारण करतांना विकासाला प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जपणे. सर्व सामान्यांना दिलासा देणे, त्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे यासाठी कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते कायम तत्पर असतात. सर्व सामान्यांची आरोग्यातून मुक्तता व्हावी या दृष्टीने सोयगाव येथे मोफत सर्वरोग उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे अब्दुल समीर यांनी स्पष्ट केले.
-----------------------------------------------
     तपासणी अंती शिबिरात आलेल्या गंभीर आजाराच्या रुग्णांना औरंगाबाद - पुणे किंवा मुबई येथील रुग्णालयात उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करू त्यासोबतच मुख्यमंत्री वैयकीय सहाय्यता कक्षातून मदत मिळवून देऊ असे श्री. समीर म्हणाले.
-----------------------------------------------
       शिबिरात नोंदणी विभाग, स्त्री रोग विभाग, हृदयरोग विभाग, नेत्र रोग विभाग, बाल रोग विभाग, रक्त लघबी तपासणी, गोवर लसीकरण तसेच औषध वितरण विभाग अशा प्रकारे विविध आजारांचे स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आल्याने रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती. त्यासोबतच अत्यावश्यक व खबरदारी उपाय म्हणून रुग्णवाहिका, विशेष मदत केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले होते. तर शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. 
-----------------------------------------------
*अब्दुल आमेर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव*

यावेळी अभिष्टचिंतनमूर्ती अब्दुल आमेर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर येथील महिलांनी औक्षण करून आमेर यांना शुभाशीर्वाद दिले. 

माझा वाढदिवस आरोग्य शिबिर सारख्या सामाजिक उपक्रमांनी साजरा केल्याबद्दल अब्दुल आमेर यांनी आयोजकांचे आभार मानले. वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे अब्दुल आमेर म्हणाले.
------------------
या शिबिरात सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. महेश विसपुते, रुग्णकल्याण समितीचे हाजी महंमद हनिफ, सोयगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. दिनाजी खंदारे, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सय्यद राशीद, सिल्लोड येथील धन्वंतरी असोसिएशनचे डॉ. निलेश मिरकर, मेडिकल असोसिएशनचे शेख युनुस, डॉ. शरीफ पठाण, डॉ. झलवार, डॉ. शेखर दौड, डॉ.रोहन राऊत, डॉ. मुद्दसीर, डॉ. अपार, डॉ. संदीप गायकवाड, डॉ. विशाल आकाते, डॉ. इब्राहिम शेख, डॉ. मीनाक्षी अंधारकर, डॉ. समीना , डॉ. सचिन पाटील, डॉ. रायगावकर , डॉ. अभिलाष गोलेचा, डॉ. अक्षय खंडेलवाल, डॉ. सुधाकर हासे, डॉ. पांडुरंग चौधरी, डॉ. विशाल गोठवाल, डॉ. तौसिफ, डॉ. कोष्टी, डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. जुनेद , डॉ. साबेर पठाण, डॉ. संदीप काकडे, डॉ. सचिन दौड , सोयगाव येथील डॉ.स्वप्नील गाढे, डॉ. दीपक चौधरी, डॉ. आबेद शेख, डॉ. वसंत कारके आदी डॉक्टरांनी सहभाग घेतला होता.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी