महिला आयोग आपल्यादारी उपक्रम निव्वळ फार्स

 
___
महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी आखलेला "महिला आयोग आपल्या दारी उपक्रम " म्हणजे निव्वळ फार्स असुन बीड जिल्ह्य़ातील महिलांच्या मुलभुत प्रश्नांविषयी वारंवार निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा राज्य महिला आयोगाकडून केवळ पत्रव्यवहार करण्याचे सोपस्कार पार पाडले जातात मात्र मागण्यांसंदर्भात दुर्लक्ष केले जात असून असा निष्क्रिय राज्य महिला आयोग बरखास्त करण्यात येऊन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांना पदमुक्त करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. 

महिलांच्या स्वतंत्र स्वच्छतागृह संदर्भात महिला आयोगाचे ७ पत्र पण निष्कर्ष शुन्य 
___
बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत तसेच नगरपरिषद प्रशासनाने संकेत स्थळावर महिलांसाठी २५ शौचालये बांधल्याबाबत खोटी माहिती प्रसिद्ध करत शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त केले असून संबधित प्रकरणात ७ वेळा निवेदन तसेच आंदोलनानंतर राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य कार्यालयामार्फत संबधित प्रकरणात जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनात नमूद मुद्यांबाबत नियमानुसार आवश्यक कार्यवाहीबाबत ईमेल द्वारे पत्रव्यवहार केला असून अद्याप पर्यंत कोणतीही सुधारणा झालेली नाही. 

महिला आयोग आपल्या दारी उपक्रम निव्वळ थोतांड:-किस्किंदाताई पांचाळ 
____
बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांनी बचत गटातील महिलांची आर्थिक फसवणूक तसेच खोटे आरोप करून बदनाम करणा-या महिला आयोग सदस्या यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तब्बल २ महिन्यापेक्षा जास्त कालावधी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणानंतर सुद्धा त्यांची साधी भेट घेतली नाही त्यामुळेच " महिला आयोग आपल्या दारी उपक्रम निव्वळ थोतांड आहे. 

निष्क्रिय राज्य महिला आयोग बरखास्तीसाठी आंदोलन 
___
दि.१ मार्च रोजी राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रूपालीताई चाकणकर या बीड मध्ये "महिला आयोग आपल्या दारी "उपक्रमासाठी येत असून त्या पाश्र्वभूमीवर महिलांचे मुलभुत प्रश्न सोडवण्यात निष्क्रिय राज्य महिला आयोग बरखास्त करण्यात यावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात असून रूपालीताई चाकणकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. 


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी