कृषि महोत्सवात कृषि विभागाच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी

कृषी महोत्सवात झाला शेतकऱ्यांचा सन्मान; हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा कृषि महोत्सवाची सांगता

बीड प्रतिनिधी : बीड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच लाखो शेतकऱ्यांच्या साक्षीने अभूतपूर्व कृषि महोत्सव हर्षात संपन्न झाला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या समारोपदिनी जिल्ह्यातील 1965 पासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित केलेल्या शेतकऱ्यांचा सोहळा आयोजित केला होता. दरम्यान आदर्श शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या कृषि महोत्सवात आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवेंच्या अफलातून नियोजनाचा लखलखाट यशश्वी झाल्याचे चित्र दिसत होते. 


 शेतकऱ्यांच्या आयुष्यात आधुनिक शेती आणि नवतंत्रज्ञपूरक शेती व्यवसायात उजेड पडणारा ऐतिहासिक महोत्सव साजरा करून बीडच्या कृषी विभागाने एक इतिहास रचला आहे. दरम्यान या शेवटच्या निरोपाच्या कार्यक्रमाच्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून श्रीमती त्रिवेणी भोंदे, संचालक उमेद, बाबासाहेब जेजुरक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, सुभाष साळवे, प्रकल्प संचालक आत्मा, दत्ता बारगजे इन्फंट इंडिया, एस. एस. मडके उपविभागीय कृषी अधिकारी माजलगाव, बी. आर.गंडे प्रकल्प उपसंचालक बीड, गरांडे जिल्ह्या गुण नियंत्रण अधिकारी, बनकर ,सेंद्रिय शेती कृषी भूषण शिवराम घोडके, अभिमान अवचार, बाबासाहेब पिसोरे आदींची उपस्थिती होती.  

यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक  बी. आर.गंडे प्रकल्प उपसंचालक आत्मा बीड यांनी केले. पुरस्कार प्राप्त शेतकरी जीवनराव बजगुडे यांनी पूर्वीची शेती आणि आजची शेती यामधील यव्यवस्था याविषयी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पिसोरे यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय उत्कृष्ट्या रित्या कृषी महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल कृषी विभाग व आत्मा यांचे विशेष अभिनंदन केले. विशेष करून आत्माचे सुभाष साळवे यांचे शेतकऱ्यांमधून कौतुक झाले. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. प्रल्हाद गवारे यांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये काळानुरूप बदल करून नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे सांगितले. सेंद्रिय शेती कृषी भूषण शिवराम घोडके यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विभाग सदैव शेतकऱ्याच्या सोबत राहतो, शेतकऱ्यांसाठी कृषि विभाग अनेक प्रकारच्या योजना राबवत असून शेतकऱ्यांची वेळोवेळी दखल घेतली जाते अशा भावना व्यक्त करत शेतकऱ्यांचा योग्य सन्मान केला जातो असे सांगितले. अभिमान अवचार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्याला संबोधित करताना जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न आणी समस्या सोडवल्या जातील असे सांगितले. तसेच कृषी विभाग आपल्या पाठीशी असून  सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहच करण्याचा प्रयत्न केलेजात आहेत. पुरुषाच्या बरोबरीने महिलांना सुद्धा सन्मान मिळाला पाहिजे कारण महिला शेतीमध्ये जास्त काम करतात. शेती हा व्यवसाय म्हणून केली पाहिजे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेती परवडते. सेंद्रीय शेती केली तर उत्पादन खर्च कमी करून आपले आरोग्य अबाधीत राखले जाते. सध्या महिला बचतगटाच्या महिला आपले उत्पादनाची विक्री स्वतः करतात त्यामुळे त्याना चांगला फायदा होत आहे. भविष्यात गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती केली तर शासनाच्या अनेक योजना आपल्यापर्यंत पोहचू शकतात. कृषी महोत्सवात उमेद गटाची मोठया प्रमाणात विक्री झाली असे जेजुरकर यांनी सांगितले. यावेळी जिल्याह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कृषी महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांबरोबर नागरिकांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला. कार्यक्रम माचे सूत्रसंचालन जुबेर पठाण तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बीड यांनी केले. आभार गोरख तरटे तालुका कृषी अधिकारी आष्टी यांनी केले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी