नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनगेवराई तालुक्यात होणार जलक्रांती

नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून
गेवराई तालुक्यात होणार जलक्रांती

उमापूर येथे अमृता नदीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ
नाम फाऊंडेशन आणि शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसहभागासह गेवराई तालुक्यातील अकरा गावांमध्ये बंधाऱ्यांचे पुर्नजीवनसह नाल्यांचे खोलीकरण, सरळीकरण व विस्तारीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. उमापूर येथील अमृता नदीच्या खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ विजयसिंह पंडित यांच्यासह नाम फाऊंडेशनचे राजाभाऊ शेळके आणि कृषीभुषण शिवराम घोडके यांच्याहस्ते करण्यात आला. सुमारे चार किलोमिटरच्या खोलीकरण व सरळीकरणाच्या कामाला यावेळी सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवार, दि.२७ रोजी उमापूर येथे अमृता नदीच्या चार किलोमिटर पात्राच्या खोलीकरण व सरळीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, नाम फाऊंडेशनचे प्रकल्प संचालक राजाभाऊ शेळके व कृषीभुषण शिवराम घोडके यांच्या शुभहस्ते कामाचा शुभारंभ झाला. सुमारे महिनाभर हे काम चलणार असून या कामी नाम फाऊंडेशनकडून पोकलेन मशिन उपलब्ध करण्यात आली असून इंधनासाठी लागणाऱ्या खर्चापैकी २५ टक्के खर्च लोकसहभाग तर ७५ टक्के खर्च शारदा प्रतिष्ठान करणार आहे. माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर यांच्यासह परिसरातील शेतकरी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेवराई तालुक्याच्या दुष्काळग्रस्त भागात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी आजवर शारदा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अमरसिंह पंडित यांनी प्रयत्न केले होते. यापूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी सुमारे ३८ गावांमध्ये जुन्या सिंचन प्रकल्पांचे पुर्नजीवन करत अनेक नाल्या व नद्यांचे खोलीकरण व विस्तारीकरण करून सिंचन सुविधा वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अमरसिंह पंडित यांनी नाम फाऊंडेशनकडे यंत्र सामग्री उपलब्ध करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीवरून पोकलेन मशिन नाम फाऊंडेशनने उपलब्ध करून दिली आहे. पोकलेनसाठी लागणाऱ्या इंधन खर्चापैकी २५ टक्के खर्च लोकसहभागातून तर ७५ टक्के खर्च शारदा प्रतिष्ठानकडून करण्यात येणार आहे. गेवराई तालुक्यातील अकरा गावांमध्ये नाला सरळीकरण, खोलीकरण आणि विस्तारीकरणाची कामे या माध्यमातून केली जाणार आहेत.

कार्यक्रमात माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी नाम फाऊंडेशनचे संस्थापक तथा सुप्रसिध्द सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे गेवराई तालुक्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्यावतीने आभार व्यक्त केले. गेवराई तालुक्याच्या दुष्काळ निर्मुलनार्थ नाम फाऊंडेशनने पोकलेनसारख्या मशिनरी उपलब्ध करून केलेले सहकार्य या भागातील शेतकरी कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अमृता नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, माजी जि.प.सदस्य रावसाहेब देशमुख, बाजार समितीचे संचालक तुळशीदास औटी, जयदिप औटी, शरद आहेर, शिवाजीराव कापसे, कदीर मिस्त्री, यादवराव त्रिंबके, भिमराव मोरे, संदिप दिलवाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी