चौसाळा येथील बसस्थानक बनले अवैध धंदयाचे माहेर घर
" चौसाळा शहरात विनापरवाना अवैध दारूचे पंचवीस दुकाने ""
(बीड प्रतिनिधी) बीड तालुक्यातील चौसाळा बसस्थानक परिसरात अवैध दारूचे दुकाने मोठया प्रमाणावर थाटले असुन सहजासहजी गावठी दारू मिळत असल्याने दारूडंयाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तरूण पिढी व्यसनाधीन झाली आहे
याकडे पोलीस प्रशासन व दारू बंदी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. एकटया चौसाळा शहरात जवळपास गावठी दारूचे पंचवीस दुकाने पाहायला मिळतात तसेच चौसाळा बसस्थानक परिसरात पाच दुकाने आढळून येतात याकडे पोलीस प्रशासन व दारूबंदी विभाग डोळेझाकपणा का करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे बसस्थानक परिसरात तळीरामाची संख्या वाढली असुन याचा नाहक ञास बसस्थानकातील प्रवासी महीला वर्गाला होत आहे
याबाबत पोलीस व दारूबंदी विभाग लक्ष घालणार आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहे.
Comments
Post a Comment