अवधा यात्रेसाठी विशेष द्रेन सोडवा वाघरी दल संघटनेची रेल्वे मंत्रालय कडे मागणी
आदिवासी पारधी टाकोणकार समाजाचे श्रद्धा स्थान असलेल्या वळेखण देवी या देवीच्या यात्रेसाठी विशेष द्रेन सोडावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय रेल्वे मंत्री यांना दि. 27-०२-२०२३रोजी देण्यात आले. आदिवासी पारधी टाकोणकार समाजाचे श्रद्धा स्थान असलेल्या वळेखण देवी या देवीच्या दर्शनासाठी वरुड. मोर्शी. परतवाडा चांदुरबाजर दर्यापूर भातकुली बडनेरा अमरावती तालुक्यातील तसेच मुर्तिजापूर अकोला शेगाव बुलढाणा या ठिकाणाहून समाजा बांधवा "ब" दर्जा प्राप्त असलेले श्री. क्षेत्र आदिशक्ती जगदंबा वळेखण देवी संस्थान अवधा खुर्द, ता नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे, लाखो भाविक दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या रात्री देवीचा महोत्सवास येतात दर वर्षी नरखेड ते भुसावळ या ट्रेन ने प्रवास करतात गाडी मध्ये आधीच गर्दी असल्यामुळे भाविकांना प्रवास करण्यात खुप अडचणी निर्माण होतात प्रवास्यांन मध्ये वाद पण होतात भाविकांचा प्रवास सुखरुप व योग्य पद्धतीने व्हावे म्हणून एक विशेष ट्रेन, किंवा ट्रेन चे डबे वाढून द्यावे दर वर्षी हनुमान जयंती या दिवशी यात्रा महोत्सव असतो म्हणून भारतीय रेल्वे विभागाने या भाविकांच्या भावना लक्षता घेऊन हनुमान जयंती या दिवशी आणि रिटन दुसऱ्या दिवशी परत येण्यासाठी नरखेड ते नांदुरा या मार्ग वर विशेष रेल्वेची सोय भाविकांसाठी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले त्यावेळी रोहित झाकर्डे ,अरविंद राठोड , लक्षमण सोळंके सुनिल सोळंके ,रविंद्र राठोड , शालिकराम सोळंके , उमेश सोळंके अतुसिंग राठोड रवी पवार पवन सोळंके शुभम सोळंके आदी समाजबांधव उपस्थित होते
Comments
Post a Comment