डाॅ.गणेश ढवळे राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित

 
__
सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने राजे यशवंतराव होळकर जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या सामाजिक तसेच भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील वैविध्यपूर्ण आंदोलनाची दखल घेऊन सामाजिक कार्याबद्दल यशवंतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सहकारी शेख युनुस च-हाटकर, मिलिंद सरपते, हमीदखान पठाण, किस्किंदाताई पांचाळ, संध्या भोसले आदि उपस्थित होते. 
     आज दि.२६ फेब्रुवारी रविवार रोजी राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण नाटय़गृह बीड येथे उद्घाटक माजी मंत्री जयदत्तजी क्षीरसागर व इंदोर होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भुषणसिंहराजे होळकर यांच्या शुभहस्ते "यशवंतरत्न पुरस्कार २०२२-२३ ने सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.सर्जेराव काळे, स्वागताध्यक्ष इंजि. विष्णु देवकते, तसेच विशेष उपस्थिती म्हणून योगेश क्षीरसागर,बाळासाहेब दोडतले, डाॅ.शिवाजी राऊत, अड.श्रीराम लाखे, संदिप उपरे, भाऊ प्रभाळे, राजेश शिंदे, लक्ष्मण नजान, कृष्णा पितळे आदिंची उपस्थिती होती  
      कार्यक्रमाचे प्रस्तावित संस्थापक अध्यक्ष प्रा. राजेंद्र गाडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन इंजि. विष्णु देवकते यांनी मानले. 


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी