संगणक परिचालकाचें काम बंद आंदोलन,अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन



     ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- ( नवनाथ गायकर यांजकडुन

    अल्पावधीतच ग्रामपंचायतीचा प्रमुख घटक व कामाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलणार्या संगणक परिचालकाच्यां विविध मागण्या कित्येक दिवसापासुन प्रलंबीत आहेत. या मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात या हेतुने उदया (दि.२८/२/२३) पासुन महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण संगणक परिचालक बेमुदत काम बंद करत संपावर जाणार आहेत. दरम्यान राज्याच्या सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाश्र्वभूमीवर संघटना मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहे. 
   सध्या सर्वत्र संगणकीय युग आहे. ग्रामपंचायतीचा कारभारही आता हायटेक झालेला आहे. दरम्यान ग्रा.प.चे संगणकीय कामकाज सुलभतेसाठी संगणक परिचालकाचीं नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सातत्याने मागणी करुनही या घटकास ग्रा.प.कर्मचारी दर्जा देणेत आला नसुन यामुळे किमान समान वेतनाचाही लाभ या घटकास मिळत नाही. 
  या घटकाची अवस्था वेठबिगारापेक्षाही खस्ता असल्याची तक्रार संगणक परिचालक करत असुन आपल्या न्याय मागणीसाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालकाच्यां संघटनेने उदया पासुन बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
   ईगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यातील संगणक परिचालक व आपले सरकार अंतर्गत संगणक चालक हे ही काम बंद आंदोलन करणार आहे अशी माहिती ईगतपुरी तालुका संघटनेचे पदाधिकारी गणेश पोरजे (शेवगेडांग ग्रा.प.,ता.ईगतपुरी) यांनी दिली आहे. 
  संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांचे आदेश, मार्गदर्शन व सुचनेनुसार ईगतपुरी व त्रंबकेश्वर तालुक्यासह संपुर्ण राज्यभरातील संगणक परिचालक मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे अशी माहिती पोरजे यांनी दिली आहे. 
   ईगतपुरी तालुक्यातुन सर्वश्री गणेश पोरजे, अंकुश राव, हिरामण गायकर, वर्षा जाधव, श्रद्धा शिंदे, निव्रुत्ती जाधव,अशोक भारती, प्रभाकर गोहिरे, शेंडे, समाधान कडवे आदिसह असंख्य पदाधिकारी मुंबई येथे आझाद मैदानावर होणाऱ्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी लवकरच रवाना होणार आहे अशी माहिती पोरजे यांनी दिली आहे.
-
संगणक परिचालकाचीं अवस्था वेठबिगारी पेक्षा दयनीय

   आजच्या संगणकीय युगात गावाच्या गावे संगणकमय करुन कामकाजात सुलभता व पारदर्शिता आणणारा मुख्य घटक असणारा संगणक परिचालक आजही मोठया प्रमाणावर उपेक्षीतच आहे.
   या संगणक परिचालकाचे तुटपुंजे मानधन वेठबिगारी पेक्षा ही कमी असुन त्यांची दयनीय परिस्थिती आहे. 
  या संगणक परिचालकानां ग्रा.प. दर्जा देऊन शासनाच्या सेवेत सामावुन घ्यावे. व किमान समान वेतनाचा लाभ मिळावा.

गणेश पोरजे
पदाधिकारी संगणक परिचालक संघटना ईगतपुरी तालुका

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी