अविनाश साबळे यांचा मांडवा ग्रामस्थांच्या हस्ते नागरी सत्कार
आष्टी( प्रतिनिधी )
बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र अविनाश साबळे यांचे दिनांक 27 /09/
2022 रोजी सायंकाळी 7 वा आष्टी तालुक्यातील श्री क्षेत्र महादेव मंदिर मांडवा या त्यांच्या गावात गावांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे योजले आहे.
राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अविनाश साबळे हे मैदानावर खेळायला सुरुवात करत होते तेव्हा मांडवा गावचे माजी सरपंच जयदेव धुमाळ यांनी गावाला शब्द दिला होता कि अविनाश साबळे हा ज्या वेळी गावात येईन तेव्हा अविनाश चा सत्कार व गाव जेवण घालणार आहे
या कार्यक्रमास मा आ सुरेश धस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी सरपंच जयदेव धुमाळ यांनी केले आहे
Comments
Post a Comment