टोकवाडी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या आदेशास उच्च न्यायालयात याचिका दाखल - भाई गौतम आगळे सर
परळी (प्रतिनिधी) सविस्तर वृत्तांत असे कि, मौजे टोकवाडी येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांनी येथे झालेल्या विकास कामाध्ये मनमानी कारभार करुन भ्रष्टाचार व बोगस बिले उचलल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून झालेल्या बोगस कामांची स्वतंत्र विशेष त्रतीय निष्पक्ष पथक नेमून चौकशी करण्यात यावी, या करीता आंदोलन करुन मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी सुनावणी घेतली, परंतु भ्रष्टाचार करणार्यांना पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्याच्या विरोधात मा. विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषण करण्यात आले होते. परंतु त्यांनी सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी बीड, यांचा अहवाल मान्य केला. सत्य परिस्थिती झाकून ठेवत राजकीय दबावाखाली वंचित बहुजन आघाडी ची मागणी फेटाळली. त्या मुळे या आदेशाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी चे परळी तालुका महासचिव तथा याचिकाकर्ते विष्णू मुंडे यांनी माननीय उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकार ग्रामविकास, मंत्रालय, मुंबई,विभागीय आयुक्त औरंगाबाद,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,गटविकास अधिकारी पंचायत समिती परळी वैजनाथ,सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायत टोकवाडी, तालुका परळी वैजनाथ इत्यादी प्रतिवादी च्या विरोधात याचिका दाखल केली आहे.अशी माहिती वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment