गाडे पिंपळगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला बेपत्ता तरुण अक्षय आरगडे याचा ताबडतोब शोध घ्यावा
गाडे पिंपळगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेला बेपत्ता तरुण अक्षय आरगडे याचा ताबडतोब शोध घ्यावा
ॲड.माधव जाधव यांनी केली मुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी
परळी( वै.):गाडे पिंपळगाव तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील अक्षय विक्रम आरगडे हा 25 वर्ष वयाचा तरुण दिनांक 21-10-2022 रोजी सकाळी नऊ वाजता पुराच्या पाण्यामुळे नदीमध्ये वाहून गेलेला आहे व तो बेपत्ता आहे.दिनांक 21-10-2022 पासून आजतागायत त्या मुलाचा शोध लागलेला नाही. तालुकास्तरावरील प्रशासकीय यंत्रणेने बेपत्ता तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यामध्ये यश आले नाही.बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.परंतु बेपत्ता तरुण अक्षय आरगडे यांच्या शोध मोहिमेमध्ये वरिष्ठ पातळीवरून योग्य ती दखल घेतली जात नाही.त्यामुळे किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष तथा काँग्रेस पार्लमेंटरी बोर्ड सदस्य ॲड. माधव जाधव शेतकरी संघटनेचे नेते कालिदासराव आपेट व तसेच गाडे पिंपळगाव येथील प्रभाकरराव वाघमोडे यांनी गाडे पिंपळगाव येथील अक्षय आरगडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व धीर देऊन याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करण्याची हमी दिली होती.त्यामुळे ॲड. माधव जाधव यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना ई-मेल करून बेपत्ता तरुण अक्षय आरगडे याचा ताबडतोब शोध घेण्याबाबत योग्य त्या सूचना संबंधित विभागाला देण्याबाबत ॲड.माधव जाधव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.
Comments
Post a Comment