माजी विद्यार्थी २२ वर्षांनंतर पुन्हा रमले दहावीच्या वर्गात,माजी विद्यार्थी मेळावा व कृतज्ञता सोहळा संपन्न

.

सोयगाव (प्रतिनिधी / यासीन बेग ) सोयगाव , दि , ३०, जिल्हा परिषद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जिल्हा परिषद येथे तब्बल २२ वर्षानंतर एकत्र जुन्या आठवणींना उजाळा सोयगाव येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे सन २००१ ते २००२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या स्नेह मिलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक लक्ष्मण रोकडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषेद चे शिक्षक एस. आर. नाईक, एकनाथ महाजन, जे.व्ही. जगताप, श्रीमती मंगला बोरसे लाभले होते. उपस्थित शिक्षक वृंद यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व शिक्षकवर्गाने माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर अनमोल असे मार्गदर्शनही केले. यावेळी सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शाळा आणि जुन्या वर्ग मित्रमैत्रिणींच्या आठवणींना उजळा मिळाला एकत्रित शिक्षण घेतले हे सर्व विद्यार्थी आज सैनिक, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, पोलीस, समाजसेवक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याचबरोबर या सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी वर्गांची प्रतिनिधित्व काही जण करीत आहे. या सर्वांनीच दिपावली सणाचे अवचित्य साधून या स्नेह मेळाव्यात उपस्थिती लावली. तब्बल २२ वर्षानंतर एकत्र येण्याचा आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला तर शालेय जीवनात घडलेल्या गमतीजमती ऐकताना सर्वजण भूतकाळात हरवून गेले होते. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळा आणि शिक्षक यांच्या विषयी ऋण व्यक्त केले पुढील काळात पुन्हा स्नेह मेळाव्याचे आयोजन व्हावे अशी भावना देखील यावेळी माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. यावेळी आदित्य घाडगे, संजय साबळे, विजेंद्र वाघ, हर्षल काकडे, विष्णू लाड, गौतम पवार, समाधान काळे, चंद्रशेखर कोळी, शरद पवार, रतन बेदवे, विनोद कायस्थ, ललित पंडीत, अनिल सूर्यवंशी, गजानन राऊत, शितल भदाणे, प्रिती पाटील, अरुणा मापारी, जयश्री पठाडे, राधा सोनवणे, गायत्री पठाडे, यांच्यासह माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले तर आभार प्रा. योगेश पुरी यांनी मानले.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी