बीड येथील साद फाउंडेशन तर्फे गरीब कुटुंबांना दिवाळीचे फराळ वाटप


   आष्टी / बीड ( प्रतिनिधी -- गोरख मोरे ) : बीड येथील साद फाउंडेशन तर्फे बीड येथील अनेक भागातील गोरगरीब कुटुंब शोधून दिवाळीचे फराळ वाटप करून या कुटुंबांची दिवाळी गोड करण्याचे काम साद फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले . हा उपक्रम बीड मधील अनेक भागात राबवण्यात आला असून ग्रामीण भागात गोरगरीब कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून साद फाउंडेशनचे अध्यक्ष मेहर शेख , उपाध्यक्ष नारायण औटे, यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून यात सर्व सहभागी मित्र परिवारांचे आभार मानले .
   याप्रसंगी बाळू तावरे , दशरथ बहिर , अमोल झोजे, कल्याण गावडे , सुनील टुले, शेख शौकत , प्रदीप आगाम , मकरंद आगाम , रवी शेंदाडे , असलम आदी मित्रपरिवार याप्रसंगी उपस्थित असून सर्वांच्या सहकार्यातून साद फाउंडेशनचा बीडमधील गोरगरीब कुटुंबांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी