हॉटेल यश पॕलेसचे आमदार सुरेश धस यांच्या शुभहास्ते मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न
पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा शहराचे माजी सरपंच तथा युवा उद्योजक संतोष जाधव यांनी छञपती शिवाजी नगर मध्ये सर्व सुविधा युक्त हॉटेल यश पॕलेस दालनाची सुरवात केली असून पाटोद्यात हॉटेल क्षेत्रात यश पॕलेस मुळे शहराच्या वैभवात वाढ झाली असून सर्व नागरिकांना दर्जेदार जेवण व सर्व सुविधा पाटोदा शहरात मिळणार आहेत. हॉटेल यश पॕलेसचे बुधवार दि. २6 ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद बीड लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांच्या शुभहास्ते उदघाटण करण्यात आले यावेळी पाटोदा शहरातील राजकीय नेते मंडळी, व्यापारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या सर्व मान्यवराचे आभार माजी सरपंच तथा नगरसेवक संतोष जाधव
यांनी मानले
Comments
Post a Comment