नंदागौळ येथील दहिफळे कुटुंबाला ॲड.माधव जाधव यांनी दिला आधार
सर्व सामान्यांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व ॲड.माधव जाधव यांच्यावर होतोय सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव
परळी प्रतिनिधी -
परळी विधानसभा मतदारसंघातील नंदागौळ येथील विठ्ठल शिवाजी दहिफळे यांनी मुलाच्या आजाराच्या खर्चाला पैसे नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. विठ्ठल दहिफळे यांचा वडजु दहिफळे हा 5 वर्षे वयाचा मुलगा सतत आजारी असतो. विठ्ठल दहिफळे हे ऊस तोड मजुर असुन मुलाच्या आजाराच्या ऊपचारासाठी सतत खर्च होत असल्याने खर्च करण्याची ताकत नसल्यामुळे तनावातुन आत्महत्या केली.ही माहिती किसान कांग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड माधव जाधव यांना पेपरमधील बातमीमुळे कळाल्यानंतर ॲड.माधव जाधव यांनी नंदागौळ येथील दहिफळे कुटुंबाला भेट देऊन मुलाच्या आजारावरील ऊपचारासाठी 10000/- ( दहा हजार रुपये ) मदत केली.व त्यांच्या कुटूंबियांना दिपावळीनिमित्त फराळ देऊन सांत्वन केले.यावेळी सोबत ॲड.गौरशेटे, प्रा.श्रिकांत खुणे , बाळासाहेब गित्ते, भास्करराव गित्ते,रंगनाथ गित्ते,देवराव गित्ते,रमेश दहिफळे,विष्णू दहिफळे आदि उपस्थित होते. मयत विठ्ठल दहिफळे यांना 2 मुले, 1 मुलगी व पत्नी असा परीवार आहे.
Comments
Post a Comment