उद्योजक प्रेमकुमार तावरे पाटील यांचे मेडीकल क्षेत्रातील यश अभिमानास्पद - मा.आ.साहेबराव दरेकर,
आष्टी येथे पाटील मेडीकलच्या शाखेचे उद्घाटन संपन्न
चांगले आचारण चिकाटी जिद्द यशाचे गुपित - ह.भ.प.दानवे महाराज
आष्टी प्रतिनिधी
तालुक्यातील खानापूर येथील युवा उद्योजक प्रेमकुमार तावरे पाटील यांनी अल्पवधीतच मेडीकल क्षेत्रात नावलौकिक करुन ३ शाखा स्थापन केल्या आहेत.त्यांची मेडीकल क्षेत्रातील कामगिरी ही अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन मा.आ.साहेबराव दरेकर यांनी केले तर चांगले आचारण,चिकाटी जिद्द यशाचे गुपित आहे.मनात जर जिद्द बाळगली तर चिकाटीने मेहनत केली तर यश हमखास मिळते असे ह.भ.प.आदिनाथ दानवे महाराज यांनी प्रतिपादन केले ते आष्टी येथे पाटील मेडीकल या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. उद्घाटन माजी आमदार साहेबराव दरेकर,ह.भ.प.आदिनाथ महाराज दानवे,जि प सदस्य उद्धव दरेकर, जि प सदस्य सतीश शिंद,युवा नेते सागर धस,युवा नेते यश आजबे,तहसीलदार किशोर मराठे,युवा नेते अमोल राजे तरटे,अॅड. भाऊसाहेब लटपटे, उद्योजक श्याम धस, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले,अजित घुले,अ.नगर केमिस्ट अध्यक्ष दत्ता गाडळकर,बंडू साहेब तोडकर,आष्टी तालुका केमिस्ट अध्यक्ष सागर भोसले, उद्योजक श्रीपाद दादा बळे, महेश सावंत,आदी उपस्थित होते.
आष्टी शहरातील गणपती मंदिर समोर तरटे कॉम्प्लेक्स येथे उद्योजक प्रेमकुमार तावरे यांनी आष्टी शहरात सुरू केलेल्या पाटील मेडिकलच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते बुधवार दि.२६ आॅक्टोंबर रोजी सकाळी करण्यात आले या अगोदर पाटील मेडीकलच्या अहमदनगर,बेलवंडी या ठिकाणी शाखा असून आता नव्याने आष्टी शहरात देखील शाखा सुरू केली आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेक गंभीर आजार, अॅक्सिडेंट चे प्रमाण वाढले असून नागरीकांना औषध उपचार सहजासहजी उपलब्ध व्हावेत यासाठी उद्योजक प्रेमकुमार तावरे पाटील मेडीकल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून अशाच पद्धतीने आणखी शाखा उपलब्ध करून मेडीकल क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल व तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन मेडीकल क्षेत्रात उतरण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देताना केले. मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न झाले. यावेळी खानापूर,विनायक नगर,आष्टी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment