शेख लाल हूसेन यांचा सेवा निवृत्ती निमित्त सत्कार संपन्न.



पाटोदा (प्रतिनिधी):~ पाटोदा येथील रहिवासी व सध्या बीड येथे स्थाईक असलेले शेख लाल हुसेन हे वस्तु व सेवाकर (GST) कार्यालय बीड येथे ३८ वर्षे यशस्वी नोकरी करून नियत वयोमानानुसार आज वयाच्या ६० व्या वर्षी सेवा निवृत्त झाले. या निमित्त त्याचे वस्तु व सेवाकर कार्यालया कडुन सत्कार करण्यात आला, व पुढील आयुष्य सुख, समृद्धी, शांती व आरोग्यदायी जावो म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी वस्तु व सेवाकर कार्यालयाचे नागरगोजे साहेब (सहाय्यक राज्य कर आयुक्त), फाटे साहेब (आस्थापना अधिकारी), सचिन जाधव साहेब (राज्य कर अधिकारी), बेद्रे साहेब, डोंगरे साहेब, गर्जे साहेब, नांदरे साहेब, केदार साहेब, विनोद बडे साहेब, निलेश बडे साहेब, ठोसर साहेब, मुंडे साहेब, लोकरे साहेब, माने साहेब, कदम साहेब, यांच्या सह कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीय उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी