भगवान विद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधीजी यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
बीड (प्रतिनिधी):- भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून तर आपल्या देशाच्या भूतपूर्व महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ, उपमुख्याध्यापक श्री वासुदेवराव येवले,श्री डी.पी.डोळे व श्री सूर्यभान मिसाळ यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सर्वांना शपथ देण्यात आली.
Comments
Post a Comment