पाटोदा तहसिलच्या कर्तव्यदक्षते मुळे पाटोद्यात आनंदाचा शिधा दिवाळी सणा दिवशीच वाटप



पाटोदा (गणेश शेवाळे) पाटोदा तहसीलच्या कर्तव्य दक्ष तहसीलदार चौघुले मँडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभागाच्या योग्य नियोजनामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशीच पाटोदा रेशनिंग दुकानांवर आनंदाचा शिधा उपलब्ध झाला असून त्याची वाटपाला सुरूवात झाली असून पुरवठा अधिकारी मुजावर यांनी रेशिंन दुकानवर सर्वत्र जाऊन पाहणी केली यावेळी पाटोदा तहसिल पुरवठा अधिकारी मुजावर यांच्या हस्ते खरेदी विक्री संघ स्वस्त धान्य दुकानात आंनदाचा शिधा वाटप करण्यात आला
सर्वसामान्य जनतेची यावर्षीची दिवाळी शिंदे सरकारने गोड केली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून हा ‘आनंदाचा शिदा ‘ राज्यातील रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरीत केला जात आहे.पाटोदा तालुक्यात रेशन दुकानावर शुभारंभ करण्यात आला असून पुरवठा अधिकारी मुजावर यांच्या हस्ते हा ‘आनंदाचा शिदा’ वितरीत करण्यात आला.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी