स्व. शंकरराव सातपुते यांच्या पुण्यतिथी निमित्त शेवाळे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन
अशोक सातपुते यांचे पंचक्रोशीतील नागरिकांना या पुण्यतिथीनिमित्त आणि कीर्तनासाठी निमंत्रण
परळी प्रतिनिधी -
दिनांक 27/10/22 गुरुवार रोजी पंचक्रोशीत ह्यातनाम असणारे व्यक्तिमत्व व अडीअडचणीच्या वेळी नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व असणारे स्वर्गवासी शंकर बंकटराव सातपुते यांच्या पुण्यतिथी निमित्त कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी हरिभक्त परायण ॲ.श्री.शंकर महाराज शेवाळे आळंदीकर यांचे दुपारी बारा ते दोन या दरम्यान कीर्तन होणार आहे तरी समस्त परळी शहरातील व तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा.
या पुण्यतिथी निमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.श्री. तुकाराम महाराज शास्त्री,ह.भ. प.जगदीश महाराज सोनवणे उपस्थित राहणार आहेत.
दुपारी दोन ते सहा या वेळेमध्ये श्री.संत गजानन महाराज मंदिर विद्यानगर,परळी येथे सुरुची भोजनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन पायल हॉटेल चे संचालक अशोक सातपुते,माऊली सातपुते,विकास सातपुते यांनी केलेले आहे..
Comments
Post a Comment