हातगाव येथील आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर व कर्मचारी यांचा मनमानी कारभार

हतगाव प्रतिनिधी:-
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांचा व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचे समोर आले. सोमवारी दुपारी साडेबारा ते एक च्या सुमारास हातगाव येथील रहिवासी गजराबाई रावसाहेब अभंग या वयस्कर महिलेला अचानक चक्कर व मळमळ होऊ लागली म्हणून त्यांच्या दिव्यांग मुलगा लक्ष्मण रावसाहेब अभंग हा आपल्या आईला घेऊन आरोग्य केंद्रत दाखल झाला. अभंग यांच्या आईला त्रास जास्त होत होता. हॉस्पिटलमध्ये कुठल्यातरी विषयावर मीटिंग चालू होती. अभंग यांनी पेश़न्ट ला तपासा डॉक्टरांना विनंती केली. परंतु डॉक्टरांनी सांगितले आमची मिटींग आहे आम्ही तीन वाजल्यानंतर पाहू. आईला जास्त वेदना होत असल्यामुळे अभंगांनी त्यांना दोन-तीन वेळा विनंती केली. तुम्हाला मीटिंग महत्त्वाची की पेशंट असं बोलल्यानंतर डॉक्टरांना राग आला. मुख्य अधिकारी डॉ तिडके मॅडम यांनी पेश़न्ट ला बाहेर काढा आसे सागितले. या सर्व प्रकाराला पाहून लक्ष्मण अभंग यांनी पत्रकार अविनाश बुटे यानां फोनवरून हा प्रकार सांगितला. बुटे गावातील असल्यामुळे ताबडतोब दवाखान्यात पोहचले व बुटे यांनी जाब विचारायला गेल्यास आरोग्य केंद्रतील आधीकार्यानी त्यांना आरेरवीची भाषा वापरली.
जनसामान्य नागरिकांना गावोगावी सुविधा मिळावी म्हणून आरोग्य केंद्र व उपकेंद्रे उभारण्यात आले परंतु या अशा प्रकारे शासकीय उपकेंद्रांमध्ये हा गैरव्यवहार जनसामान्यांसोबत सुरू आहे. या घडलेल्या प्रकारामुळे जनसामान्यात आता संताप व्यक्त केला जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी