चंपावती महोत्सवात संगीत विशारद, गायक शेख मज़हरोद्दीन सन्मानित
बीड (प्रतिनिधी ) - शहरात घेण्यात आलेल्या चंपावती महोत्सवात ज्येष्ठ संगीत विशारद तथा गायक शेख मज़हरोद्दीन यांना शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बीड शहरात हा जिल्हा स्तरिय चंपावती महोत्सव दिनांक १५ ते २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत भव्य-दिव्य असा घेण्यात आला. सदर महोत्सवात समूहगीत, गायन, वैयक्तिक गीतगायन, नृत्य, चित्रकला अशा विविध कला प्रकारांचा समावेश होता. या सर्व कला प्रकारामध्ये एकूण ८४४४ स्पर्धाकांनी सहभाग नोंदवला होता. जिल्ह्यातील शाळांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. इंग्रजी आणि मराठी शाळांचा स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धेची तीन गटात विभागणी करण्यात आली होती. पहिला गट पहिली ते तिसरी, दुसरा गट चौथी ते सहावी आणि तिसरा गट सातवी ते दहावी पर्यंत होता. सदर स्पर्धेच्या परीक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ संगीत विशारद तथा गायक शेख मज़हरोद्दीन यांच्यावर होती. ती त्यांनी संपूर्ण आठवडाभर अत्यंत उत्कृष्टरित्या पार पाडल्याने कार्यक्रमाच्या समापनावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळक यांनी त्यांना स्मृतीचिन्ह व...