मुहम्मद ख़लीलोद्दीन(ख़मर)मोमीन यांचे अल्पशा आजाराने निधन
बीड (प्रतिनिधी): मूळचे बीड शहरातील जव्हेरी गल्ली भागातील रहिवासी मुहम्मद ख़लीलोद्दीन उर्फ़ ख़मर मुहम्मद शहाबुद्दीन मोमीन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६७ वर्षाचे होते.
मरहूम मुहम्मद शहाबुद्दीन बीडवाले मौलवीसाब यांचे ज्येष्ठ पुत्र मुहम्मद ख़लीलोद्दीन हे अनेक वर्षांपूर्वी व्यवसायाकरिता लातूर जिल्ह्यात स्थाईक झाले होते. तिथे त्यांनी आपली मेहनत व चिकाटीच्या बळावर वेगवेगळे व्यवसाय केले. त्यात त्यांना चांगले यश मिळत गेले. आता ते लातूर शहरातील एक ख्यातनाम बॅग विक्रेते म्हणून ओळखले जातात. बॅगच्या व्यवसायात त्यांचे किरकोळ आणि ठोक अशा दोन्ही प्रकारचे उद्योग यशस्वीरित्या सुरू आहेत. बीड शहरातून लातूरला गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. अशा या कर्तबगार व्यावसायिकाचे वयाच्या ६७ व्या वर्षी अगदी अल्पशा आजाराने दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ गुरुवार रोजी मध्यरात्री दोन वाजता निधन झाले. त्यांची नमाज़ ए जनाज़ा महेदवीया दायरा औसा येथे पठण करण्यात आली तर दफनविधी महेदवीया दायरा कब्रस्तान औसा येथे करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले-सुना, एक मुलगी-जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. बीड शहरातील मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांचे ते काका होते. मोमीन कुटुंबीयांच्या दुःखात न्यूज 23 मराठी परिवार सहभागी आहे.
Comments
Post a Comment