शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतारी चिन्हाने महाराष्ट्राचे राजकीय तख्त हलणार:- विवेक कुचेकर
(बीड प्रतिनिधी)" एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकिन सगळी गगणे
दिर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजला गुणी "
कविवर्य केशवसुतांची हि कविता ,ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोर्याच्या तुतारीने दिल्लीचेही तख्त हलवले होते अशी तुतारी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली.ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहुर्तमेढ रोवुन आपल्या शरीरातील रक्ताचं पाणी करुन पक्ष वाढवुन संपूर्ण देशाच्या राजकारण नावारुपाला आणला त्याच शरदचंद्रजी पवार यांच्या पाठीत खंजर खुपसून घर का भेदी लंका ढायै बनुन शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षावर आपला दावा ठोकला ते घरचे भेदी बनुन जरी सत्तेच्या लालसेपाई गद्दार झाले तरी त्यांना हिच महाराष्ट्राची जनता त्यांची खरी जागा येणार्या काळात दाखवुनच देणार आहे. आज जरी या लोकशाही देशात हुकुमशाही गाजवत कायद्याला रखेल बनवण्याचे काम गद्दार करु पाहत आहेत तरी एक ना एक दिवस सत्याचा सुर्य उगवणारच आहे आणी पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकर्याचे जाणते राजे सत्तेवर येणारच आहेत. पक्ष आणी चिन्हावर जरी कपटनिती वापरुन ताबा मिळवलेला असेल पण ही कपटनिती जास्त काळ टिकणार नाही, कारण घोडे मैदान फार दुर राहीले नाही. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभा महाराष्ट्र तर आहेच परंतु बीड जिल्हा हा कायम शरदचंद्र पवार साहेबांच्या पाठिशी राहणारा जिल्हा आहे हे बीडच्या नागरिकांनी वेळोवेळी प्रसंगी दाखवुन दिले आहे. ते म्हणतात ना वाघ हा वाघच असतो तो भलेही कुठल्याही जंगलात जावो परंतु त्या वाघाचा दरारा, भिती, आणी लढण्याच्या कडव्या झुंजीपुढे त्या जंगलातील माकडांनी कितीही साम दाम दंड भेद वापरुन राज्य करायचा प्रयत्न जरी केला तरीही जंगलाचा राजा हा वाघच असतो. तसेच या महाराष्ट्राच्या राजकीय जंगलाचे राजे मा.शरदचंद्रजी पवार साहेबच आहेत. कुणी कितीही उडया मारु द्या, पण वाघ संयमांने लढाई करत आसतो त्यामुळे पक्ष किंवा चिन्ह गेलं म्हणून वाघ संपला हा विचार करु नका. वाघ एखाद्या लढाईत घायाळ होत असतो पण तो संयमं राखत पुन्हा मैदान गाजवत आसतो. बीडच्या राजकीय क्षेत्रात शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शब्दावर काम करणारे कार्येकर्तै आहेतच परंतु आमदार संदीप भैय्या क्षीरसागर व डाँ.बाबुरावजी जोगदंड यांच्या सारखे हाडामासाचे सच्चे शिलेदार देखील आहेत. त्यामुळे बीड जिल्हा हा शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत अखेरच्या क्षणापर्यंत होता , आहे, आणी असणार आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांचे घडयाळ हे चिन्ह जरी गेले असले, तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचे शोर्य ज्या तुतारीने गाजवले होते तीच महाराजांची तुतारी आता शरदचंद्रजी पवार साहेबांना निवडणुकीचे चिन्ह म्हणून मिळाले आहे. आगामी काळात हिच तुतारी भल्याभल्याची पुंगी वाजवुन कशी या महाराष्ट्राचे तख्त राखते हे बघाच. कारण विरोधकांचा लढा हा राजकीय क्षेत्रातील भिष्म पित्याम्याशी आहे. शरदचंद्रजी पवारांनी जेवढं आयुष्य महाराष्ट्राच्या आणी देशाच्या राजकारण घालवले आहे. तेवढ वय सुध्दा विरोधकांचे नाही, त्यामुळे हजारो वनव्यातुन तावुन सुलाखुन निघालेल्या शरदचंद्रजी पवार यांच्या व्यक्तीमत्वाला आणी राजकारणातील समर्पणाला झळालीच मिळनार आहे. कारण सोन्याला सुध्दा तावुन सुलाखुन निघाल्याशिवाय चकाकी येत नाही. तशीच चकाकी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाला येणार आणी आगामी काळात राज्याची धुरा पुन्हा महाराष्ट्रातील जनता पुन्हा जाणत्या नेत्याच्या म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातीच देणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. सत्तेच्या लालसेपाई महाराष्ट्र लूटायला निघालेल्या विरोधकांनी जास्त आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न करु नये.कारण तुमचा हा आनंद दिर्घकाळ टिकणारा नाही. सत्ता येते आणी जाते, परंतु सत्तेच्या लालचेपोटी तुम्ही किती खालच्या स्तरावरच्या राजकारणाची सुरुवात केलीत हे जनतेने पक्के ध्यानात ठेवलेले आहे. बीड म्हणजे ईथे नाही कुणाचीच भिड्, बीडची जनता आता पुन्हा सत्याच्या पाठीशी उभी राहणार आणी विरोधकांच्या चारी मुंडया चित्तच करणार आहे. बीडमध्ये तरुण तडफदार आमदार म्हणुन ज्या संदीप भैय्या क्षीरसागरांवर शरदचंद्रजी पवार साहेबांनी विश्वास दाखवत बीड विधानसभेला तरुण आमदार दिला,आणी संदीप भैय्या क्षीरसागरांनी पवार साहेबांचा विश्वास अबाधित राखत लोकप्रिय आमदार म्हणुन पोचपावती मिळवली , ज्या पवार साहेबांनी डाँ.बाबुरावजी जोगदंड यांच्या सारखे कार्यकर्तै बीडच्या जनतेच्या अहोरात्र सेवेसाठी निर्माण केले आणी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेला त्यांचे न्याय आणी हक्क मिळवुन दिले त्या शरदचंद्रजी पवार साहेबांना बीडची जनता शरिरातील शेवटचा श्वास असेपर्यंत विसरणार नाही. कारण शरदचंद्रजी पवार साहेबांचे बीडच्या जनतेवर विशेष असे प्रेम पहील्या पासुन राहीलेले आहे, माझी माणसे म्हणुन हक्काने आवाज देणार्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हाकेला आजपर्यंत बीड जिल्ह्यातील जनतेने सादच दिलेली आहे. त्यामुळे येणार्या काळात पक्ष किंवा चिन्ह जरी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातुन हिसकावून जरी घेतले असेल, तरीही आता छत्रपती शिवाजी महाराजांची शुभ असणारी तुतारी त्यांच्या हाती आहे. शरदचंद्रजी पवार साहेब या तुतारीच्या आवाजाने येणार्या काळात महाराष्ट्रातील भल्याभल्यांची वाजवुन महाराष्ट्राचे तख्त हालवतात कि नाही हे बघाच !
Comments
Post a Comment