आमच्या अख्त्यारीत रस्ता नाही म्हणा-या एचसीपीएल कंपनीने अखेर दुरूस्ती केली; डॉ.गणेश ढवळेंच्या पाठपुराव्याला यश:-

आमच्या अख्त्यारीत रस्ता नाही म्हणा-या एचसीपीएल कंपनीने अखेर दुरूस्ती केली; डॉ.गणेश ढवळेंच्या पाठपुराव्याला यश:- डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश:-  अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरून लिंबागणेश गावांमध्ये प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वार याठिकाणी एचसीपीएल कन्स्ट्रक्शन द्वारा करण्यात आलेले काम सदोष असल्याने मोठा चढ करण्यात आलेला असल्याने याठिकाणी  लहान चारचाकी,तिनचाकी तसेच दुचाकी वाहनांना अडचण येत असुन लहान चारचाकी वाहनांचे इंजिन घासत असे तर आठवडी बाजारात येणाऱ्या तिनचाकी वाहनांना धक्का मारावा लागत असे तसेच दुचाकी वाहनस्वार गाडीवरून पडत असत त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढल्याने तातडीने चढाची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केल्यानंतर एचसीपीएल कंपनीने वरिष्ठांची दिशाभूल केल्याने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ( मर्या) छत्रपती संभाजीनगर यांनी गावांमध्ये प्रवेश करणारा हा रस्ता या कार्यालयाच्या अख्त्यारीत येत नसुन फक्त नालीचे काम आपल्या विभागाकडून करण्यात आले आलेले असुन रस्ता हा राज्यशासन किंवा ग्रामपंचायत यांच्या अख्त्यारीत येत असल्याने त्यांची दुरुस्ती सदर विभागाकडून करण्यात यावी असे पत्रकाद्वारे उत्तर दिले गेले होते. मात्र संबंधित प्रकरणी डॉ.गणेश ढवळे यांच्या लेखी तक्रारी तहसीलदार सुहास हजारे यांनी लिंबागणेश येथे प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्ती करण्याचे आदेश दिले होते.शेवटी काल रात्री एचसीपीएल कन्स्ट्रक्शन मार्फत या रस्ता कामाची दुरुस्ती करण्यात आली असुन डॉ.गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.त.यामुळे भविष्यात संभाव्य अपघात टळण्यास मदत होणार आहे त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी