मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी चा संचालक फरार

मी शेवगावकर चा दणका मोडला कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मातृतिर्थ अर्बन लिमिटेड च्या संचालकांचा मनका 

मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी चा संचालक फरार
{ अविनाश देशमुख शेवगांव }
 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या
 व अधिक परतव्याचे आमिष दाखवून शेवगावकरांना कोट्यवधी रुपयांना गंडवलेल्या नेवासा रोड लगत २-३ तीन महिन्यापूर्वी मातृतीर्थ
सिंदखेडाराजा अर्बन को - ऑप क्रेडिट सोसायटी
लि. शाखा चालू करून कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून बँकेचा संचालक चव्हाणने पूर्ण नाव माहित नाही कोट्यवधी रुपये घेऊन पोबारा केला आहे.
मोठ्या थाटामाटात ओपनिंग करण्यात
आलेली निधी बँकेने फसवणूक केल्यामुळे
शेवगांवकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे,
दरम्यान, मातृतीर्थ सिंदखेडाराजा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. ने इतर बँकेपेक्षा जास्तीचे
व्याज देण्याचे आमिष दाखवून एजंट मार्फत
नागरिकांची दिशाभूल करून करोडो रुपयांच्या एफ.
डी. करून घेतल्या. पण जेव्हा काही नागरिक एफ.
डी. ब्रेक करण्यासाठी गेले असता संबंधित शाखेत पैसेच नाही. अशी बतावणी करून पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
तेव्हा फसवणूक झाल्याचा प्रकार समोर
आला. अवघ्या तीन महिन्याच्या आताच बँकेने गाशा गुंढाळून करोडो रुपयांची शेवगांव करांची
फसवणूक करून संचालक चव्हाण अजूनही फरारच
आहे. तरी अशी भामटेगिरी करणाऱ्यां वर सरकारी संबंधित यंत्रनेचे लक्ष कसे काय जात नाही ? हा
मोठा प्रश्न निर्माण होतो. आर. डी. एम. मध्येही करोडो अडकले आर डी एम एक्सचेंज हे ऑनलाईन पद्धतीने आलेले डॉलर भारतीय चलनात रूपांतर करून
नागरिकांच्या बँक खात्यात जमा होत होते, परंतु तेही अवघ्या काही महिन्यातच बंद पडले. त्यातही राज्य भरातील नागरिकांचे कोट्यवधी रुपये अडकले
आहेत.



ज्यांचे ज्यांचे पैसे अडकले आहेत त्यांनी आ. बी. आय. आयकर विभाग आणि ई. डी. { सक्त वसुली संचालनालय } कडे रीतसर तक्रार करून या भामट्या लोकांना धडा शिकवावा.

 अविनाश देशमुख शेवगांव 
 पत्रकार सामाजिक / कार्यकर्ता

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी