उप अभियंता श्री. सूर्यवंशी यांची त्वरित बदली करण्याची एमआयएम पक्षाची मांगणी.



नाशिक प्रतिनिधी : माजिद खान 

उप अभियंता श्री. सूर्यवंशी हे भद्राकाली डिवीजन मध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 
काम करीत असतांना त्यांचे विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहे. नागरिकांना नाहक त्रास होईल असे वर्तन करीत आहे. अधिकारी हे कर्मचार्यांना गोरगरीब नागरिकांकडे पाठवून त्यांना नोटिस ना देता मिटर कट करणे.
त्यांचे मिटर फाॅल्टी असल्याचे दाखविले जात आहे. अशिक्षित गोरगरीब नागरिकांनवर लक्ष केले जातात व मोठमोठे व्यावसायिक लोकांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
उप अभियंता श्री. सूर्यवंशी हे एकच ठिकाणी सुमारे दहा वर्षांपासून काम करीत आहे. याचे कारण त्यांचे राजकीय संबंध असल्याने दिसुन येते. कारण शासकीय सेवेत असतांना तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीत झाल्यास त्यांची बदली कुली जाते. उप अभियंता श्री. सूर्यवंशी यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी अन्यथा एमआयएम पक्ष स्थानिक नागरिकांनचे वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.
मा. मुखमंत्री सचिवालय कार्याल्यात तसेच मा. श्री चेतन वाडे साहेब कार्यकारी अभियंता महावितरण नाशिक विभाग -1 यांना निवेदन देतांना उपस्तिथ अहमद काजी शहराध्यक्ष, जावोद पंजाबी साहेब कोशाध्यक्ष , दिलीप दीक्षित साहेब पर्वक्ता , दीपक वाघ पश्चिम विधानसभा अध्यक्ष , अब्दुल्ला अत्तार, डॉ. मुजफ्फार कुरेशी आदी .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी