नवगण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर नारायणराव काळे तर संचालकपदी रिजवानोद्दीन रजिओद्दीन सिद्दीकी यांची निवड


बीड दि.२६ (प्रतिनिधी) येथील नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) च्या नूतन कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी किशोर नारायणराव काळे यांची तर संचालक पदी रिजवानोद्दीन रजिओद्दीन सिद्दीकी निवड करण्यात आली.

नवगण शिक्षण संस्था, राजुरी (न.) च्या कार्यकारी मंडळाची पाच वर्षांच्या कालावधीकरिता निवड करण्यात आली आहे. यामध्ये किशोर काळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून खजिनदार पदी पूजा क्षीरसागर यांची तर रिजवानोद्दीन रजिओद्दीन सिद्दीकी यांची कार्यकारी मंडळाच्या संचालक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 
सदरील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी बद्दल संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्षा डॉ.दीपा क्षीरसागर, सहसचिव डॉ.योगेश क्षीरसागर तसेच संस्थेच्या संचालक डॉ.सारिका क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. विश्वंभर देशमाने, डॉ.सुधाकर गुट्टे, डॉ.सिद्धार्थ जाधव, कर्मचारी दशरथ काकडे, लक्ष्मण चंदनशिव, एल.बी.पवार यांच्यासह कार्यकारी मंडळाचे सर्व संचालक, सभासद, सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी