जीवाचीवाडी साठवण तलावातील विद्युत पंप प्रशासनाच्या आशीर्वादाने सर्रास चालू!
केज प्रतिनिधी :केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे साठवण तलवातील विद्युत पंप बंद करण्याचे आदेश तहसीलदार तथा दंडाधिकारी,केज यांनी आदेश निर्गमित करून सिंचन विभाग,महावितरण विभाग, कर्मचारी तहसील कार्यालय केज येथील तलाठी,मंडळ अधिकारी कर्मचाऱ्यासह जीवाचीवाडी ग्रा.पं.चे कर्मचाऱ्यांसह साठवण तलावातील विद्युत पंप बाहेर काढणे विद्युत पुरवठा बंद करणे कोणी पाणी चोरून घेत असेल तर संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार, केज यांनी संबंधित कार्यालयास आदेश देऊन कळविले आहे परंतु संबंधित विभागाच्या कर्मचारीने तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन केल्याचे दिसून येतनाही वरिष्ठांनी विद्युत पंप साठवण तलावाच्या बाहेर काढण्याचे स्पष्ट आदेश क्र.७७/दि. १३/०२/२०२४ च्या पत्रातअसताना संबंधित यंत्रणेने काही शेतकऱ्याशी संगणमत करून व आर्थीक लक्ष्मीचे दर्शन घेऊन का!एकही विद्युत पंप/मोटार बाहेर न काढता सर्रास साठवण तलावात ठेऊन रात्रीच्या वेळी संबंधित शेतकरी काही कर्मचाऱ्यांशी संगनमत करून त्यांच्या आशीर्वादाने रात्री थेट लाईट जोडून चोरून अनाधिकृत पाणी उपसा बिनदास्त सर्रास शेतीसाठी पाण्याची चोरी करीत आहेत. साठवण तलावाती पाणी उपसा बंद करण्याची मागणी नारायण चौरे यांनी केली आहे. संबंधित नियंत्रण यंत्रणेने तहसील कार्यालयाच्या आदेशाच्या पत्राचे पालन करून सर्व शेतकऱ्यांना समान न्याय मिळावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आमच्या प्रतिनिधीने,श्री.अभिजीत जगताप,तहसीलदार,केज यांशी संपर्क केला ते म्हणाले की तलाठी,उत्रेश्वर घुले यांना सांगतो.
आमच्या प्रतिनिधीने,श्री.लोढे उप विभागीय अधिकारी,जलसिंचन, जलसंपदा विभाग,केज यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की पथक तयार करावे लागते मी चव्हान साहेबांना बोलतो.आपण तहसीलदार साहेबांना पण बोला,उदयाच कारवाही करूत!
Comments
Post a Comment