नगरपंचायत मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाला दांडी बहादर कर्मचाऱ्याकडून केराची टोपली
पाटोदा (प्रतिनिधी)पाटोदा नगरपंचायत कार्यालया मधील अधिकारी व कर्मचारी रोज व वेळेवर उपस्थित रहात नाहीत अशी वारंवार तक्रार होत होती यामुळे नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यानी अधिकारी व कर्मचाऱ्यांरी यांना वेळेवर व दररोज उपस्थित रहावे अशी नोटीस काढली होती मात्र त्या आदेशाला पाटोदा नगरपंचायतचे नगररंचणाकार,ओएस, बांधकाम इंजिनियर,पाणी पुरवठा इंजिनियर,यांच्या सह इतर कर्मचारी यांनी बुधवार दिनांक 28 रोजी दांडी मारुन मुख्यधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली यामुळे सतत व वेळेवर न उपस्थित रहाणार्यी दांडी बहादर नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाचा धाक राहिला नाही आता तर हे दांडी बहादर नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशाला ही जुमानानत यामुळे नगरपंचायत मुख्यअधिकारी काय पुढे काय कारवाई करणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे
Comments
Post a Comment