शेवगाव बस स्थानकाची दुरावस्था नवनिर्माण दिन बांधकामाचा राडाराडा आणि काही खाजगी वाहनांची अडचण प्रवाशांचे हाल
{ अविनाश देहमुख शेवगांव } 9960051755
 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव मधील बस स्थानकावर प्रवासांना  होणारी  अडचण नेमकी कधी दूर होणार आणी कोण करणार ???  असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे शेवगाव मधील बस स्टॅण्ड  येथे चुकीच्या पद्धतीने  बसस्थानकात लागणाऱ्या अवैध  रिक्षा तसेच   खाजगी चार चाकी व मोटर सायकल  यांचा विनाकारण  प्रवाशांना व  शाळकरी विद्यार्थ्याना   आबाल वृद्ध महिला व बालक यांना त्रास  होत आहे या कडे  शेवगाव एस. टी.  डेपोच्या प्रशासनाचे  दुर्लक्ष  होताना दिसत आहे बस स्टॉप  वर दिवस रात्र   पाकीट मारी चेंज मॅचिंग व छेडछाडीचे प्रकार यांचं मोठ प्रमाण वाढल आहे  नवीन बस स्थानकाचा राडा रोडा सगळीकडे पसरला आहे शेवगाव आगाराला पूर्णवेळ डेपो मॅनेजर नाही बस कायम ना दुरुस्त असतात पूर्ण क्षमतेने फेऱ्या होत नाहीत बस स्थानकाचा कारभार मराठवाड्यातील  बाहेरून येणाऱ्या बसेस व शेजारच्या तालुक्यातील टाइमिंग बसेस वर अवलंबून आहे एकेकाळी उत्पन्नाच्या बाबतीत व बस फेऱ्यांच्या बाबतीत शेवगाव आगार  जिल्ह्यात अव्वल स्थानी होते  पूर्वी एक कर्मचारी हातात माईक घेऊन खाजगी वाहन व रिक्षा चालकांना बाहेर हाकलत असे परंतु अलीकडे तसं काही होताना दिसत नाही आता हे कुठे तरी थांबलं पाहिजे  शेवगाव   प्रवासी संघटना  अस्तित्वात नाही अनेक लांब पाल्याच्या फेऱ्या टाइमिंग पुणे गाड्या रद्द केल्या आहेत त्याचा भुर्दंड  प्रवाशांना  सहन करावा लागत आहे
ताजा कलम
 डिसेंबर 2018 पासून शेवगाव शहराच्या नवीन बस स्थानकाचे काम गेली सहा वर्ष रखडले आहे संबंधित ठेकेदार डेपो मॅनेजर विभागीय परिवहन अधिकारी आणि मुंबईचे मुख्य कार्यालय पत्र पत्र खेळत आहे 
नवीन बस स्थानकाला आठ ते दहा फूट उंची दिल्याने भविष्यात प्रवाशांना शिड्या लावून खाली उतरावे लागते की काय अशी परिस्थिती आहे
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Comments
Post a Comment