केतकी चितळेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध,भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करा नगरसेवक ॲड विकास जोगदंड
बीड (प्रतिनिधी) 27 फेब्रुवारी
संविधान विरोधी विचारांचे राज्यकर्ते जेंव्हा आपला अजेंडा अमलात आणतात तेंव्हा सामाजिक सलोखा बाधित करण्यासाठी काही विघ्नसंतोषी प्रवृतिना पुढे करतात
केतकी चितळे या त्याच व्यवस्थेच्या मोहरप्या आहेत वारंवार त्या महामानवा बद्दल अपशब्द वापरून अवमान करत आहेत परळी येथे झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत केतकी चितळे यांनी आपल्या जातीयद्वेषी मानसिकेतचे प्रमाण देत अनुसूचित जाती, जमाती समाज बांधवांचे खच्चीकरण करत त्यांना हीन ठरवत अपमानकारक वक्तव्य करून
तमाम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत म्हणून केतकी चितळे वर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 चे कलम 1(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक ॲड विकास जोगदंड यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे
आम्ही शिव,फुले,शाहू, आंबेडकर,साठे,
संत तुकाराम महाराज,संत रविदास,संत गाडगेबाबा,या महामानवांच्या विचारांचे पाईक आहोत आम्ही सर्व जाती, धर्माचा आदर करणारे असून सामाजिक,समता,
बंधुत्वता जोपसाणारे पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला देश हित सर्वोच्च आहे
तेंव्हा सामाजिक एकात्मता टिकवण्याची प्रत्येकाची जबाबदारी असून प्रशासनाने देखील सामाजिक अशांतता पसरवणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी ही नगरसेवक ॲड विकास जोगदंड, नाना कदम, विष्णू गायकवाड,सत्यभान जाधव,मंगेश जोगदंड,सचिन जाधव,हिरामण गायकवाड,महादेव वंजारे,राजेश कोकाटे सह आदींनी दिलेल्या निवेदनातून केली आहे
Comments
Post a Comment