तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मान्यवरांनी केली विज्ञान प्रदर्शनाची पाहणी ; विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पाला कौतुकाची थाप
बीड(प्रतिनिधी):- येथील तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथे दि २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता 'भव्य विज्ञान प्रदर्शन' सोहळा पार पडला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन इंजि. वशिष्ठ तावरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी तुलसी शैक्षणिक समूहाचे प्रमुख तथा देवगिरी प्रतिष्ठान अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, रावसाहेब उनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात तुलसी इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी विविध कल्पनांनी आपले प्रकल्प सादर केले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट प्रकल्पांना पारितोषिक देण्यात आले. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत होती. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.यावेळी विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उमा जगतकर यांच्या सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment