पुणे गुन्हे अन्वेषण विभाग यांची शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये धडक कारवाई चोरीचं सोन घेणाऱ्या सोनारांची धावपळ तिघांना चौकशीसाठी नेले पुण्याला
!!! मी शेवगावकर चा दणका मोड ला चोरीचं सोनं घेणाऱ्या सोनारांचा मानका !!
पुणे गुन्हे अन्वेषण विभाग यांची शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये धडक कारवाई चोरीचं सोन घेणाऱ्या सोनारांची धावपळ तिघांना चौकशीसाठी नेले पुण्याला?
{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
याबाबत सविस्तर वृत्त असे की शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता एक संशयित अपुरुष आरोपी आणि महिला आरोपी घेऊन पुणे गुन्हे अन्वेषण विभाग तुकडी क्रमांक एकचे अधिकारी आणि कर्मचारी शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये घुसले संबंधित महिलेने आणि पुरुषाने काही दुकानदार दाखवले यांच्याकडे आम्ही चोरीचे सोने विकले असे सांगितले त्यातील एका बड्या व्यापाऱ्याने चोरीचे दोन ग्रॅम सोने देऊन प्रकरण जागेवर मिटविले परंतु इतर तीन सोनारांनी आम्ही सोने घेतलेच नाही आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असे सांगितले त्यामुळे पुणे पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी पुणे येथे नेले यातील एक सराफ व्यावसायिक पुण्याचे पोलीस आलेले आहेत हे कळताच खोटा खोटा दवाखान्यात ऍडमिट झाला तरीही पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले शेवगाव सराफ व्यावसायिक असोसिएशन यांनी दिवसभर शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून सुद्धा पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संबंधित असणारांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी बरोबर नेले
संबंधित असारात व्यवसायिकांना छोट्या सोनार दुकानदारांना त्रास होऊ नये म्हणून तालुक्याचे आमदार जिल्ह्याचे खासदार व अनेक बड्या राजकीय नेत्यांना फोन करून सुद्धा व संपर्क करून सुद्धा संशयित आरोपी सराफ व्यवसायिक यांना पुणे पोलिसांनी आपल्या सोबत नेले याची गेले दोन दिवस शेवगाव शहर आणि तालुक्यात उलट सुलट चर्चा सुरू आहे शेवगाव सराफ बाजारपेठेमध्ये विना पावती चे सोने मोडून घेणे असे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत परंतु या सर्व प्रकरणाचा इमानदार सरफ व्यावसायिकांना कायमच त्रास होत असतो याचीही चर्चा शेवगाव शहरामध्ये सुरू आहे
विशेष बाब
शेवगाव शहरामध्ये यापूर्वीही बनावट सोनी बँकेमध्ये ठेवून कोट्यावधी रुपये अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने सध्या पावसाळ्यात निघालेल्या अर्बन बँकेमध्ये प्रकार घडला होता या निमित्ताने याची आठवण शेवगावकर यांना झाली
क्रमशः
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
Comments
Post a Comment