केतकी चितळे सामाजिक समता आणि एकता बिघडवते आहे तिला वेळीच आवर घाला-डॉ.जितीन वंजारे

बीड प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यामधील परळी येथे ब्राह्मण एक्य परिषदेने जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमांमध्ये तथाकथित ब्राह्मणाची एक बाई तिचं नाव केतकी चितळे आहे ती एक मानसिक रुग्ण असल्याकारणाने तिच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं हे असं असताना देखील तिचा बोलवता धनी बाहेर काढून महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक स्थैर्यता ,सामाजिक एकता आणि सामाजिक समता चालू आहे ती कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न आहे .असे विकृत मानसिक विचाराची पिल्ले समाजामध्ये सोडवले जातात आणि त्यांच्याकडून काहीतरी वदवून महाराष्ट्र अशांत करण्याचे काम संबंध महाराष्ट्रामध्ये एक अदृश्य शक्ती करत आहे हे केवळ आणि केवल राजकीय हेतू पोटीच होत असल्याने सामजिक एकता बिघडत आहे अशी खंत सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले आहे.
         बीड जिल्ह्यामधील परळी येथे ब्राह्मण एक्य परिषदेने घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये केतकी चितळे सह अनेक ब्राह्मण समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांसमोर केतकी चितळे ॲट्रॉसिटी या विषयावर गंभीर आरोप करत बोलत होती तिचं असं म्हणणं आहे की मागील पाच वर्षांमध्ये ॲट्रॉसिटी नोंद झालेली गुन्हे बाहेर काढा आणि त्यामध्ये तपासा की किती गुन्हे खरे आहेत आणि किती खोटे आहेत, विशेष म्हणजे हे गुन्हे कोणकोणत्या जाती वरती जास्त प्रमाणात दाखल होतात त्यापैकी ब्राह्मण समाजात जास्त आहे असेही तिने म्हटलेलं आहे,तिने एक नुकतेच उदाहरण दिलं की एक वकील आहे त्या वकिलाचा साक्षीदार सुद्धा बऱ्याच गुन्ह्यांमध्ये एकच आहे आणि त्याने तब्बल साठ ॲट्रॉसिटीच्या केसेस दाखल केलेल्या आहेत, त्याने अलीकडेच टीसी वरती सुद्धा गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये त्याला स्टेशन वरती रेल्वेचे तिकीट खरेदी केलं आहे का नाही ? असा प्रश्न केला होता म्हणून त्याने गुन्हा दखल केला. केतकी चितळेच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे कारण केतकी चितळे ही एपीलेप्सी या आजाराची रुग्ण असून एपिलेप्सी मध्ये फिट्स आल्याकारणाने रुग्ण डोक्यावर पडण्याची दाट शक्यता असते आणि या केसेस मध्ये रुग्ण केव्हाही बरळल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.मी स्पष्टपणे सांगू शकतो की परळी येथील ब्राह्मण एक्य परिषदेमध्ये केतकी चितळे ही डोक्यावर पडल्याप्रमाणे काहीतरी बरळली आहे तिच्या म्हणण्यानुसार मी तिला चॅलेंज करतो की आमच्या आदिवासी बांधवांवर दलित,शोषीत, पिडीत बांधवांवर ज्या काही चोरी-मारी लुट-मारी आणि गुंडगिरी केल्याप्रकरणाची  गुन्हे नोंद होतात त्याचीही सत्यता तपासली पाहिजे आणि त्यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांना कसे करून जेलमध्ये डांबले जाते त्यांच्याकडून त्यांच्या  जमिनी हस्तगत केल्या जातात, त्यांना गावांमध्ये लोक राहू देत नाहीत, त्यांच्या आया बहिणींची अब्रू रस्त्यावर लुटली जाते परंतु ही संघर्षशील जात कोणाकडेही दाद फिर्याद मागत नाही परंतु केतकी चितळे ज्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची माहिती अधिकारांवर माहिती मागत आहे त्या माहिती ऐवजी दलित शोषित पीडित आणि आदिवासी लोकांवरती जे खोटे-नाटे गुन्हे दाखल केले जातात आणि गावा-गावांमध्ये ॲट्रॉसिटी चा वापर पुढारी आणि राजकीय नेते कशा पद्धतीने करतात आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात याचाही सर्वे होणे गरजेचे आहे.नुसतं डोक्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे विचार घेऊन एस.सी, एस.टी. समाजाचं संरक्षणाचे शस्त्र हिसकावून घेण्याचे काम आजकालचे तथाकथित उच्च समाजातील लोक करत आहेत ते अत्यंत चुकीचं असून केतकी चितळे सारख्या मानसिक विकृत आणि वैचारिक अपंगत्व असलेल्या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून तिने जर माफी मागितली नाही तर त्याचे पडसाद सबंध महाराष्ट्राला भोगावे लागतील असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा दलित नेते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी म्हटले आहे.
          इतर राज्यामध्ये जंगलामधील आदिवासी लोक हटवून त्या ठिकाणी मोठ्या कंपन्या उभारल्या जात आहेत जसकी हसदेव जंगल,मध्यप्रदेश, उडीसा येथील जंगलामध्ये राजकीय लोकांचं आणि बाबा बुवांच वाढत अतिक्रमण बंद करायला हवं.आदिवासीना उघड्यावर झोपण्याची वेळ आलेली आहे,त्यांना अमानुषपणे मार दिला जातो, त्यांच्या छोट्या छोट्या मुलींचे रेप केले जात आहेत,त्यांची झोपडी जाळून टाकली जाते, जिवंत लोकं जाळले जातात तेंव्हा माझ्या गोर गरिबांची वंचितांचा आवाज म्हणून केतकी सारख्या मानसिक विकृती काहीच बोलणार नाहीत आणि त्यांच्याकडून त्या अपेक्षाही नाहीत पण कमीत कमी स्वतःच्या घाण तोंडातून गरळ ओकून सामाजिक स्थर्य बिघडू नका .त्यांच्या उद्धारासाठी कोणी तरी बोललं गेलं पाहिजे परंतु असं या ठिकाणी तस होत नाही फक्त सामाजिक समता आणि एकता बिघडवण्यासाठी काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणजे त्याच्यावरती नक्कीच वेगवेगळे वाद निर्माण होऊन समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवून लोकांची मने मूळ मुद्यावरून बाजूला सारून महाराष्ट्रातील वैचारिक लोक येथे झालेल्या भ्रष्टाचारावर,भ्रष्टनेत्यांवर,विकासाच्या मुद्यावर बोलू द्यायची नाहीत ह्याची पुरेपूर सरकार कडून खबरदारी घेणं चालू आहे.भ्रष्ट लोकांना पाठीशी घालून एकही हिताची योजना न राबवता सत्तेतील पाच वर्ष अशीच घालून फक्त विरोधात आल्यानंतरच येथील विकासासाठी सत्तेची जाण या लोकांना येते. ही अतिशय वाईट गोष्ट असून यापुढे समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही गोष्टी जरी एखादी केतकी चितळे सारखी मानसिक विकृत व्यक्ती करत असेल तर ती तात्काळ बंद करणे शासन प्रशासनाची जबाबदारी आहे.नसता एकदा का येथील सामाजिक एकता आणि समता  बिघडली की मोठमोठ्या दंगली घडून देश संपवला जाईल.चोरी, रॉबरी,हाणामारीच्या जाहीर केसेस गोरगरीब दलित शोषीत पिडीतांवर टाकल्या जातात, त्या तात्काळ तपासून त्या जर खोट्या असतील तर त्याप्रमाणे टाकणाऱ्या वरती गुन्हे दाखल झाली पाहिजे.रामदेव बाबा आणि वेगवेगळ्या राजकीय धार्मिक बुवा बाबांनी सगळ्या आदिवासी लोकांच्या शेती, कुरन,जंगल उध्वस्त केली त्यांच्या वर अमानुष हानमार केली त्यांची संसार उध्वस्त केली आणि तरीही हुकूमशाही प्रमाणे आरोपींविरोधात काहीच कार्यवाही केली जात नाही.अश्या वेळेस केतकी चितळे सारखी विकृती का बोलत नाही.दलीत आदिवासी अत्याचार रोखण्यासाठी ही केतकी चितळे का रस्त्यावर येत नाही आणि म्हणून म्हणतो अश्या येड्या इपर्याना वेळीच आवर घाला नसता आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून आंबेडकरी हिसका दाखवून देऊ कारण अट्रोसिटी कायदा हा गोर गरीब दलीत आदिवासीचां आरक्षणाचा कायदा असून ज्या समाजाला वंचित ठेवलं आहे, अस्प्रश ठेवलं होत त्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी हा कायदा आहे त्यामुळे अट्रोसिटी कायदा आणि संविधानाची रक्षणाची जबाबदारी पार पाडू आणि विकृत जातीयवादी मानसिकतेला हाणून पाडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा दलीत नेते मा.सम्राट डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी