राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चिंचाळा येथे भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर


मोठ्या संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा गावातील नागरिकांचे आव्हान

वडवणी प्रतिनिधी 

वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दि.३१ मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन केले आहे या जयंतीनिमित्त गावामध्ये विविध शिबिरांचे आयोजन केले आहे यामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर ,तसेच वंधत्व निवारण शिबीर(पशुसंवर्धन विभाग) हे घेण्यात येणार आहे तसेच याच दिवशी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक चिंचाळा नगरीमधुन निघणार आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की प्रति वर्ष प्रमाणेच याही वर्षी चिंचाळा येथील गावकऱ्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे आयोजन ३१ मे रोजी केले या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यामध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे यामध्ये विविध आजारांची तपासणी करून रोग निधान करत योग्य ते उपचार केले जाणार आहेत तसेच,रक्तदान शिबिर ही घेण्यात येणार आहे यामध्ये गावातील १०१तरुण रक्तदान करणार आहेत, त्याचबरोबर प्रथमच जनावरांचे वंधत्व निवारण शिबिर (पशुसंवर्धन विभाग) होनार आहे यामध्ये ज्या गाय, म्हैस जनावरांमध्ये गर्भ धारणा होती नाही आशा जनावरांची तपासणी करून योग्य तो उपचारही केला जाणार आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची गावांमधून भव्य दिव्य अशी मिरवणूक ही निघणार आहे तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ.सुरेश साबळे(जिल्हा शल्य चिकित्सक बीड) हे उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन जयसिंग सोळंके (माजी सभापती जिल्हा परिषद बीड) व डॉ. अमोल गीत्ते साहेब (जिल्हा आरोग्य अधिकारी बीड) हे उपस्थित राहणार आहेत तसेच जिल्हाभरातील तज्ञ डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर ही उपस्थित असणार आहेत.तरी या जयंती कार्यक्रमास व आरोग्य तपासणी शिबिरास चिंचाळा परीसरातील नागरीकांणी उपस्थित राहण्याचे आव्हान जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी