माजलगांव शहरातील पावसाळ्याचा विचार करुन व अतिक्रमणातील मलबामुळे तुंबलेल्या नाल्या तात्काळ साफ करा-शेख रशिद
एमआयएम पक्षातर्फे दिला आंदोलनाचा इशारा
माजलगाव-माजलगाव शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली तसेच नागरिकांच्या घर,दुकान समोरील वट्टा तोडण्यात आले पण तोडलेल्या वट्टा,मलबा जसा कि तसा पडुन आहे त्यामुळे नाल्या तुंबल्या असुन सांडपाणी रस्त्यावर आल्यामुळे नागरिकांची आरोग्य धोक्यात आले आहे तसेच पावसाळ्याचा विचार करुन माजलगाव शहरातील तुंबलेल्या गटारी तात्काळ साफ करा अशी मागणी एमआयएम शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
माजलगाव शहरातील दलित, मुस्लिम वस्तीमधील भीम नगर, आझाद नगर, गौतम नगर,बिलाल मोहल्ला,ईदगाह,गांधनपुरा,राजगल्ली,बागवान गल्ली, कुरैशी गल्ली,तानाजी नगर, इंदिरा नगर,अशोक नगर, हनुमान चौक,मेन रोड व वेगवेगळ्या प्रभागातील नाल्यांची सफाई नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करुन तात्काळ नाल्या साफ करावे नसता लोकशाही मार्गाने एमआयएम पक्षातर्फे आंदोलन करु असा इशारा एमआयएम शहराध्यक्ष शेख रशिद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
Comments
Post a Comment