लिंबागणेश येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी ; पुतळे हटवल्याच्या निषेधार्थ निदर्शने
बीड तालुक्यातील मौजे.लिंबागणेश येथे मोठ्या उत्साहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली.याचवेळी महाराष्ट्र सदनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान महिलांचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त कार्यक्रमात पुतळे हटविण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध करत अहिल्यादेवी होळकर चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी डॉ.गणेश ढवळे, राजेभाऊ आप्पा गिरे, रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे, कृष्णा पितळे, ऋषिकेश तागड, संदिप मुळे,सुदाम मुळे, भालचंद्र गिरे, भगवान मोरे, विक्रांत वाणी,बालु मुळे,शहादेव धलपे , जयदेव गिरे, धनंजय मुळे, अँड.गणेश वाणी आदी सहभागी होते.
सविस्तर माहितीस्तव
--
दि.२८ मे रोजी महाराष्ट्र सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटविण्यात आले.संस्कृती जतन करण्यासाठी हजारो मंदिरांचा जिर्णोद्धार करणा-या सामाजिक न्यायासाठी दिपस्तंभ असणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणा-या वंचित, उपेक्षितांच्या शिक्षणासाठी अंगावर शेण,माती, चिखल झेलणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान या कार्यक्रमात जाणिवपूर्वक करण्यात आला असून ही घटना अतिशय निषेधार्ह असुन या घटनेमुळे सर्वसामान्य माणसांच्या मनात चिड निर्माण झाली असुन या घटनेचा लिंबागणेशकरांच्या वतीने निदर्शने करून महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला.
ग्रामपंचायत मार्फत कर्तबगार महिंलाचा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 'पुरस्काराने सन्मान
---
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल ग्रामपंचायत स्तरावर समिक्षा रामचंद्र गिरे आणि संगीता रामचंद्र गिरे यांचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 'देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामुकाका थोरात , समीर शेख, नामदेव गायकवाड , अशोकराजे वाणी, संतोष भोसले आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment