अंबाजोगाईच्या 6000 नोटीस धारकांना मोहम्मद असिफोद्दीन खतीब (बाबा) यांच्या मुळे दिलासा मिळणार!

सहा हजार अतिक्रमित नोटीस धारकांनी घाबरू नये - मोहम्मद असिफुद्दीन खतीब


नोटीस धारकांनी घाबरण्याची गरज नाही ही खाजगी मालमत्ता असून माझा पाठपुरावा जेष्ठ विधिज्ञ् ऍड.अण्णाराव पाटील यांच्या मार्फत न्यायालयीन व प्रशासन दरबारी चालू आहे.आम्हाला नक्कीच न्याय भेटेल. जेव्हाही मालमत्ता अधिकृतरित्या आमच्या नावे होईल तेंव्हा या खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्या गोर गरीब जनतेची कुटुंब उध्वस्त न करता त्यांची नावे अधिकृत मालकी हक्कात लावणार.-मोहम्मद असिफुद्दीन खतीब (सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष, काँग्रेस)



अंबाजोगाई --:

महाराष्ट्रात प्रामुख्याने बीड जिल्ह्यात शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.यात अंबाजोगाई शहरातील तब्बल 6000 अतिक्रमण धारकांना नोटीसा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.यामुळे भयभीत असलेल्या अंबाजोगाईच्या 6000 नोटीस धारकांना येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद असिफोद्दीन खतीब (बाबा) यांच्या मुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नोटीस धारकापैकी मौजे.मोरेवाडी ता. अंबाजोगाई येथील सर्वे नं. 614/27, 614/26, 614/25, 614/24, 614/15, 614/23, 614/20, 621/2, 621/2/1, 621/3, 623/2/1, 623/2/2, 623/3, 606, 603, 604, 605, 552/82/7, 584/26, 583/25, 588/30, 552/82/1, 551/81, 548/78, 547/77. 564/5, 549/79, 546/76, 565/6, 574/15, 569/10, 566/7, 575/16, 570/11, 553/39, 552/82/2, 82/3. 578/19/1, 579/20/2, 579/20/1, 578/19/1, 545/75, 558/ 84/1/2, 558/85/2, 559/ 86/3, 556/83, 585/27, 589/31, 568/9, 574/ 74/2, 550/80, 563/4, 555/37, 559/86/1, 559/86/2, 554/38, 592/34, 591/33, 567/8, 579/20, 575/17, 552/82/4, 552/82/5.587/3, 558/84. 559/85/1, 593/35, 590/32, 73/1, 73/2, 578/ 19/2, 586/28, 552/82/6, 578/19/2, 544/74/1, 544/74/3 इत्यादी सर्वे नं. मधील सर्व जमीन ही मुळ मालक नवाब मीर मुज्जफर अली खान यांच्या वडिलोपार्जीत मिळकत असुन यांनी निजाम कालीन काळात फौज निगराणी (तामिरात.) रेवेन्यू सरकार (निजाम) छावण्या तसेच निजाम कालीन काळात फौज निगराणी (तामिरात.) रेवेन्यू सरकार (निजाम) छावण्या तसेच तत्कालीन सैन्य दलातील घोड-स्वार यांच्या रहिवासासाठी तकालीन मुळ मालकांकडुन खरेदी केलेली आहे. याच दरम्यान निजामशाही संपुष्टात आली. सदर जमीनीचे विद्यमान मालक हे वास्तवासाठी मौजे हैद्राबाद येथे इ.स. 1948 साली कायमचे स्थायिक झाल्याने राष्ट्रपती यांनी याच्या आदेशानुसार मराठवाडयातील निजाम कालीन जमीन ही शासनाने खाजगी मालमता म्हणुन जाहीर केलेली आहे. सदर जमीनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करुन काही लोकांनी जमीन बळकावलेली आहे. तसेच सदर गटातील जमीन ही निर्विवादीत असून सदरची जमीन ही वडिलोपार्जीत खाजगी मालमत्ता आहे.

मीर मुजफ्फर अली खान यांनी या संपत्तीची पॉवर ऑफ ऍटोनी मोहम्मद असिफुद्दीन खतीब यांच्या नावे केली असून सदरील खाजगी मालमत्तेसाठी मोहम्मद असिफुद्दीन खतीब हे न्यायालयीन तसेच प्रशासनाशी लढत आहे.राष्ट्रपती यांच्या आदेशानुसार मराठवाडयातील निजाम कालीन जमीन ही शासनाने खाजगी मालमता म्हणुन जाहीर केलेली आहे.शहरातील 6000 कुटुंबास नोटीस आल्याने या सर्वांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गांवर होते नोटीसा आल्या पासून अनेकांच्या झोपी उडाल्या आहे.यात प्रामुख्याने जवळपास सर्वच वस्त्या या गोरगरीब जनतेच्या असल्यामुळे अनेकांनी आयुष्याची पोटाला मारून कमवलेली तुटपुंजी या घरासाठी घालवली मात्र हे घरच आता शासन निष्काशीत करणार असल्याने शहरातील सहा हजार कुटुंब उध्वस्त होणार असे वाटत असताना त्यांच्या मदतीसाठी देवदूताच्या रूपात मोहम्मद असिफुद्दीन खतीब हे धावून आले आहेत.त्यामुळे भयभीत झालेल्या सहा हजार कुटुंबास मोहम्मद असिफुद्दीन खतीब यांच्यामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी