डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये चळवळीतील अनुभवी कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये चळवळीतील अनुभवी कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

अजिंक्य चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वडवणीत DPI पक्षाची बैठक संपन्न.

आप्पाराव मुजमुले सुभाष साळवे अरुण आव्हाड मनोहर कसबे बाळू आव्हाड महादेव आव्हाड पिंटू आढागळे यांनी केला प्रवेश.

वडवणी तालुक्यातील आणखी शेकडो कार्यकर्ते डी पी आय च्या वाटेवर.
        वडवणी प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, या व सर्वच महापुरुषांच्या विचाराला अनुसरून सबंध बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व देशात चळवळीच्या माध्यमातून या महापुरुषांची शिदोरी स्वतःच्या खांद्यावर घेऊन समाजाला एक वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचे काम ज्यांनी आयुष्यभर केलं असे स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे, कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या बीड जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून चळवळीमध्ये काम केलेलं आहे. काम करत असतांना अनेक मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करत आलेले आहेत. परंतु आज कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी कुठेतरी एखाद्या नेत्याची गरज आहे. आणि त्या गरजेमुळे किंवा प्रमुख कार्यकर्त्यांच्या विविध अडचणीसाठी आता धावून येणारे नेतृत्व म्हणून डीपीआय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वडवणी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आणि यापुढेही शेकडो कार्यकर्ते डीपीआय या पक्षाच्या वाटेवर आहेत. पाठीमागेच डीपीआयच्या राज्य अधिवेशनामध्ये ज्यांनी या महाराष्ट्राचं प्रमुख लीडर म्हणून गेल्या पन्नास वर्षांमध्ये काम केलेलं आहे असे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये अजिंक्य चांदणे हे डीपीआय या पक्षाच्या माध्यमातून देशाचं राजकारण करू शकतात त्यांच्यामध्ये ती धमक आहे अशा शब्दांमध्ये अजिंक्य चांदणे याचं कौतुक केलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मातंग समाजासह इतर समाजाला सोबत घेऊन एक मातंग समाजाची ओळख निर्माण करून देण्याचे काम डी पी आय पक्षाच्या माध्यमातून होत आहे आणि होणारही आहे. जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल तिथे जशास तसे उत्तर देण्याची धमक फक्त अजिंक्य चांदणे यांच्यामध्ये आहे. अशा प्रकारचे वक्तव्य कार्यकर्ते करत आहेत. आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण आहेत. मातंग समाजाची एक वेगळी ओळख या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचं काम अजिंक्य चांदणे यांनी हाती घेतलेलं आहे. आणि त्यांच्या या कामाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी डीपीआई पक्षामध्ये प्रवेश केला ते अप्पाराव मुजमुले, सुभाष साळवे माजी सरपंच, मनोहर कसबे, अरुण आव्हाड माजी सरपंच, महादेव आव्हाड माजी ग्रामपंचायत सदस्य, करण थोरात, गहिनीनाथ आढागळे, बाळासाहेब आव्हाड, यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. यावेळी या बैठकीला उपस्थित अजिंक्य भैय्या चांदणे डीपी आयचे प्रदेश अध्यक्ष, सुभाष लोणके जिल्हाध्यक्ष, अमोल शेरकर पश्चिम जिल्हाध्यक्ष, सुनील पाटोळे युवा जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब पौळ जिल्हा सहसचिव,अमोल मैंदेकर बीड कार्य अध्यक्ष, विलास कारके वडवणी तालुकाध्यक्ष, विजय मुजमुले युवक तालुका अध्यक्ष वडवणी, आकाश पाटोळे शहराध्यक्ष, महादेव साळवे कार्याध्यक्ष, करण भिसे तालुका उपाध्यक्ष सोशल मीडिया,अभिषेक हातागळे तालुका अध्यक्ष सोशल मीडिया,

वडवणी-
सिद्धेश्वर पाटोळे, सचिन पाटोळे, अतुल पाटोळे.

कवडगाव-
फुलचंद समर्थ, अशोक साळवे, महादेव साळवे, अमोल चौरे दिपक ऊखांडे.

(पुसरा) - 
दिलीप मुजमुले, सुभाष मुजमुले, गणेश मुजमुले, अमोल मुजमुले, विशाल मुजमुले, अणा मुजमुले, विशाल मुजमुले, निखिल मुजमुले, अभिषेक मुजमुले, सुनिल मुजमुले, कृष्णा मुजमुले, करण गालफाडे, संकेत मुजमुले, 

तिगाव -
दशरथ कुचेकर, भारत कुचेकर, महादेव कुचेकर, गणेश कुचेकर, पवण कुचेकर. 

दुकडेगाव-
लक्ष्मण आवाड, आत्माराम आवाड, शिवाजी आवाड 

चिचांळा -
जयदत्त आवाड, बाबासाहेब आवाड, बाबुराव आवाड, आर्जुन मोरे, अनिकेत आवाड, बाळु आवाड, भागवत आवाड, अण्णासाहेब आवाड, दत्ता आवाड, भगवान आवाड 

देवगाव-
बळीराम गवळी, दत्तात्रय सुरवसे 

चिचंवण-
बापू हनवते, राहुल पाटोळे, पोपट हनवते, बाळू हनवते.

देवडी- 
राहुल वैरागे, करण भिसे, जगन्नाथ लोंढे, दिनकर लोंढे, गोविंद आडागळे, अंकुश आडागळे.

चिखलबीड-
करण थोरात, अंगद थोरात, पप्पू थोरात, माणिक थोरात.

यांच्यासह हजारो कार्यकर्ते वडवणी शहरांमध्ये दाखल झाले होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी