केंद्रीय पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी फिरोज शेख यांची निवड
औरंगाबाद प्रतिनिधी /मुश्ताक शाह
केंद्रीय पत्रकार संघ व किया न्युज (kay News)यांच्या सयुक्तविध्यामाने शिर्डी येथे भव्य पत्रकार संमेलन2023चे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाला प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर, काय न्युज (Kay news)चे संपादक गुप्ता जी,Z24 तास चे मा. वृत्त निवेदक तथा मुख्य भाजपा चे सह प्रवक्ते अजित चव्हाण, गौरव शेट्टी,व्यास जी, आदी उपस्थित होते मागील आनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या हिररीने सोडविणारे व केंद्रीय पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष तथा युद्ध भूमी चे संपादक फिरोज शेख यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर व राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन संपादक फिरोज शेख यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी त्यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांनी फिरोज शेख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या भव्य पत्रकार संमेलन 2023 हे साईबाबांच्या नगरीत पार पडले संमेलनात सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये मनोगत व्यक्त केले.
यावेळी
पुणे,सोलापूर,अहमदनगर,पालघर,पनवेल,औरंगाबाद,या ठिकाणाहून बरेच पत्रकार बंधू हजर होते.या वेळी क्या न्यूज ऍप चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
Comments
Post a Comment