शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ ला होणार
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान, पिंपळगाव जलाल ता येवला जि. नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ ला होणार
येवला तालुका प्रतिनिधी – येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय दुसरा साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून साहित्यिक येणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा संजय वाघ यांनी कळविले आहे.
येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान यांचे वतीने शहादू शिवाजी वाघ यांच्या स्मृती दिनानिमित राज्यस्तरीय दुसऱ्या साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रतिष्ठानने माहे डिसेंबर २०२२ मध्ये राज्यभरातील साहित्यिकांकडून आपल्या कलाकृती पुरस्कारासाठी मागविल्या होत्या. कथा संग्रह, कविता संग्रह , गझल संग्रह, अभंग, ओवी, पोवाडा, चारोळी, काव्यसंग्रह, कादंबरी अशा विविध प्रकारच्या राज्यभरातून जवळपास ६५ प्रवेशिका आल्या होत्या .. त्या सर्व कलाकृती तज्ज्ञ परीक्षकांकडे परीक्षणासाठी पाठविल्या होत्या त्यापैकी काव्यसंग्रहाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार यवतमाळ येथील कवी संतोष जगताप यांच्या “कृष्णालिका” या कलाकृतीला , तर कथासंग्रहाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मा डॉ सुनिता चव्हाण, बोरीवली, मुंबई यांच्या “भयातून निर्भयाकडे संवाद सेतू” या कलाकृतीला तसेच कादंबरीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोल्हापूर येथील लेखक मा विकास गुजर यांच्या “बाभूळमाया या कादंबरीला मिळाला आहे तर पुणे येथील गझलकार डॉ अविनाश सांगोलेकर यांच्या “अविनाशपासष्ठी” या गझल संग्रहासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या कलाकृतींचे परिक्षण ख्यातनाम परीक्षक अनुक्रमे कविता संग्रहाचे मा.प्रा. विजय लोंढे, पुणे, कथा संग्रहाचे मा प्रा.डॉ निवेदिता राऊत, नागपूर, कादंबरीचे परीक्षण मा.प्रा. सुवर्णा चव्हाण, येवला नाशिक तर गझल संग्रहाचे मा प्रा. पंडित भारुड, कोपरगाव, यांनी परिक्षण केले.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ४ जून २०२३ रोजी पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्याजवळील पांडुरंग लॉंन्स येथे होणार आहे. हा सोहळा दोन सत्रात होणार असून पहिल्या सत्रात काव्य वाचन स्पर्धा होणार असून राज्यभरातील कवींनी यासाठी एक महिना आधी नाव नोंदणी केलेली आहे. दुसऱ्या सत्रात साहित्य कलाकृती पुरस्कार वितरण सोहळा व काव्यवाचन स्पर्धेचे पुरस्कार दिले जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी कोणत्याही साहित्यिक अथवा कवींकडून शुल्क आकारलेले नाही.
या सोहळ्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन मा. विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे , कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा रमेश दादा घोडेराव साहेब, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीचे चेअरमन मा डी.के.देवकर साहेब व सर्व संचालक मंडळ विशेष उपस्थितीत राहणार असून प्रसिद्ध साहित्यिक राजेंद्र उगले- नाशिक, मा. विष्णू औटीसाहेब – उपायुक्त, आयकर विभाग , औरंगाबाद , जेष्ठ साहित्यिक मा सुभाष सोनावणे-अहमदनगर, जेष्ठ विचारवंत मा. भाऊ थोरात- शिर्डी, जेष्ठ साहित्यिक संजय पठाडे सर, चित्रपट अभिनेते राम गायकवाड , मा विजयजी गिरासे – उद्योजक, पुणे, मा सुश्रुत जोशी पुणे, मा. सोमनाथ माने – विस्तार कृषी विद्यावित्ता, पुणे, मा. बन्सी कांबळे – पोलीस अधिकारी, पुणे, गुंफाताई कोकाटे – प्राचार्या- बेलापूर महाविद्यालय, बेलापूर श्रीरामपूर, मा. सेवानिवृत्त वनाधिकारी रामदास पुजारी, अ.जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक मा. कारभारी बाबर, धुळे येथील साप्ता. अभिनव खानदेशचे संपादक मा. प्रभाकर सूर्यवंशी, अहमदनगर येथील मा. प्रा. शर्मिला गोसावी, प्रसिद्ध मुखपृष्ठचित्रकार मा. अरविंद शेलार, लेखिका मा. सौ. सविता दरेकर- नाशिक , मा. स्वाती ठुबे, कवयित्री तथा औषध निर्माण अधिकारी पारनेर. पोलीस अधिकारी मा. रिताताई जाधव-मुंबई, साखर कामगार पतपेढीचे मॅनेजर मा. राजेंद्र सोनवणे, मा. प्रा. तुषार ठुबे, प्रा. मंगल सांगळे- सिन्नर, मा.प्रा. गीतांजली वाबळे, शिरूर-पुणे, मा गणेश भोसले- राळेगणसिद्धी तर तामिळनाडू येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर गौडर, कर्नाटक येथील प्रसिद्ध वकील मेहबुब बिस्ते , महाराष्ट्र राज्य प्रत्रकार संघाचे येवला तालुका अध्यक्ष मा. संतोष विंचू तसेच पिंपळगाव जलाल ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, व इतर सर्व यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ, संपादक मा प्रशांत वाघ , सचिव मा राजेश वाघ यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment