बार्टी संशोधक विद्यार्थी आंदोलन आणि माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. आशा नवनाथ रणखांबे

बार्टी संशोधक विद्यार्थी आंदोलन आणि
 माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. आशा नवनाथ रणखांबे
( लेखक - जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे )
----------------------------------------------
   सौ. आशा नवनाथ रणखांबे कोठेही स्वतःची प्रसिद्धी न करता सामाजिक , शैक्षणिक , प्रसार माध्यम , पोलीस - ठाणे जिल्हा महिला दक्षता कमीटी इ. वेगवेगळ्या ठिकाणी घर संभाळत फार मोठे सामाजिक कार्य करीत असून महान विभूतीच्या वाटेवर चालत स्वतःला घडवत आहे. उत्कृष्ट सामाजिक काम करणारी माझी जीवनसाथी हिचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे. 
         शिक्षणापासून वंचित असणाऱ्या आदिवासी कातकरी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. घरादार - परिवाराचा विचार न करता अहमदनगर , नाशिक, पुणे, पालघर - जव्हार, मोखाडा शहापुर आदिवासी कातकरी वाड्यांवरती जाऊन पालकांना कन्व्हेन्स करून शिक्षणाचे महत्त्व पटवून शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शाळेत आणण्याचं काम करत आहे. 
       52 दिवस आझाद मैदान येथे चाललेल्या बार्टी संशोधक विद्यार्थी कृती समिती, महाराष्ट्र राज्य आंदोलन यशस्वी झाले. हे आंदोलन प्रसार माध्यमातून महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात घेऊन जाण्याचे निस्वार्थी कार्य तिने केले. उत्कृष्ट कार्य करीत असताना कुठे ही तिने स्वतःच्या नावाची प्रसिद्धी करून स्वतःला मिरवले नाही की, मानपान मिळेल या हेतूने कधीच पाहिले नाही. चांगल्या समाजिक कार्याला आणि उपक्रमाला नेहमीच पाठबळ आणि प्राधान्य देत असते. अशी माणसे फारच दुर्मिळ असतात.
     बुद्धभूमी फाऊंडेशनने विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी केलेल्या आवाहनाला योग्य प्रतिसाद देऊन आंदोलनाकडे लक्ष दिल्याबद्दल भदन्त गौतमरत्न महाथेरो संस्थापक - मुख्य विश्वथ बुद्धभूमी फाऊंडेशन, कल्याण मार्फत तिला सन्मानपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
     लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने तिला अनेक आशीर्वादासह पुढील वाटचालीस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो !

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी